नवी मुंबई : कोकण विभागीय स्तरावरील लोकशाही दिन सोमवार दि. 08 जुलै, 2024 रोजी सकाळी 10.30 वाजता कोकण भवनातील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या समिती सभागृह, 1 ला मजला, कोकण भवन, नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे.
लोकशाही दिनाच्या बैठकीस सर्व विभागीय स्तरावरील प्रमुख अथवा त्यांचे प्रतिनिधी यांनी उपस्थित असणे आवश्यक आहे. काही अपरिहार्य कारणामुळे उपस्थित राहणे शक्य नसल्यास त्यांनी विभागीय आयुक्त यांची परवानगी घेणे आवश्यक आहे. असे परिपत्रकाद्वारे उप आयुक्त (सामान्य प्रशासन) कोकणभवन अमोल यादव यांनी कळविले आहे.
०००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *