राजीव चंदने
मुरबाड : तालुक्यातील नागरिकांची तहान भागवण्यासाठी केंद्र सरकारने कोट्यवधी रुपयांच्या सुमारे दोनशे जल जीवन मिशन च्या योजना अंमलात आणल्या असल्या तरी त्यातील शेकडो योजना या महावितरणच्या विज मिटरविना चालत असुन दररोज लाखो युनिट चा वापर होणाऱ्या या पाणीपुरवठा योजना बद्दल महावितरण अनभिज्ञ असल्याने महावितरणचा कारभार म्हणजे आंधळे दळते आणि कुत्रे पिठ खाते असा चालत असल्याने ग्राहकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
केंद्र सरकारने ग्रामीण भागातील नागरिकांची तहान भागवण्यासाठी हर घर नल ! सर घर जल हि योजना जल जीवन मिशन योजनेच्या माध्यमातून अमलात आणली.त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी हि ग्रामपंचायत ला अदा करण्यात आला.या योजना डिसेंबर 2022 ते डिसेंबर 2023 या कालावधीत पुर्ण करायच्या होत्या.मात्र काही तांत्रिक कारणांमुळे पन्नास टक्के योजना या अपुर्ण स्वरूपात आहेत.तर पन्नास टक्के योजना या पुर्ण झालेल्या आहेत.या योजना साठी शासनाने विहित खोदणे,पाईप लाईन.घरा घरात नळ बसविणे व विहिरीतील पाण्याचा उपसा करण्यासाठी लागणारा मोटार पंप व विज कनेक्शनसाठी देखील लाखो रुपयांचा निधी शासनाने अदा केलेला असताना ठेकेदाराने विहिरीतील पाणी हे घरा घरात पोहोचविले मात्र तो पाणी पुरवठा करण्यासाठी लागणारे विज कनेक्शन न घेता आकडे टाकून मागील वर्षापासून विज पुरवठा होत असल्याने या विज चोरी कडे महावितरणचे दुर्लक्ष असुन एखाद्या सर्व सामान्य ग्राहकांचे विज बिल थकले तर तात्काळ त्याचा विज पुरवठा खंडित केला जातो. मात्र दररोज लाखो युनिट चा वापर करणाऱ्या पाणी पुरवठा योजना मधुन किती विज जळत असेल व त्यातून आपले किती नुकसान होते याचा महावितरणच्या अधिकाऱ्यांनी विचार न केल्याने महावितरण च्या महसुलात दिवसेनदिवस घट होत चालली आहे.शिवाय मुरबाड मध्ये सुमारे पस्तीस टक्के घट होत असताना या योजनांमुळे महावितरणच्या घाट्यात भर पडत आहे.त्यामुळे महावितरण चा कारभार म्हणजे आंधळे दळते आणि कुत्रे पिठ खाते असा चालत असल्याने यावर कोणाचे नियंत्रण आहे की नाही.हा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.
कोट
तालुक्यातील जल जीवन मिशन योजनेच्या कनेक्शन संदर्भात या कार्यालयाकडून अजुन एकही विजय मिटर जोडण्यात आला नाही.त्याची मागणी येताच मिटर बसविण्यात येतील – केतन थत्ते.उप अभियंता.महावितरण मुरबाड.
