ठाणे : डॉ. राजेश मढवी फाऊंडेशन व रोटरी क्लब ऑफ ठाणे मीडटाऊन यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे स्टेशन सॅटीस पुलाखाली यंदा नव्या वर्षात भव्य असे रक्तदान शिबिर संपन्न झाले. स्व. वसंतराव डावखरे रिक्शा युनियनचे मोलाचे सहकार्य या शिबिरास लाभले. ठाण्यातील नामांकित नवजीवन ब्लड बँकेच्या वतीने रक्त करण्यात आले. सदर रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अंदाजे 100 च्या वर रक्तदान त्यांनी रक्तदान केले. विशेष म्हणजे रक्तदानासाठी जाती-धर्माचे बंधन नसते असे पुण्य कर्म त्या सर्वपलीकडे असल्याची प्रचिती आज आली. सदर कार्यक्रमास भाजपा शहर अध्यक्ष संजय वाघुले,रिक्षा युनियन अध्यक्ष राजू सावंत,मा.नगरसेविका प्रतिभा मढवी, निशिकांत महांकाळ , पोलीस इन्स्पेक्टर भालचंद्र तरे ,राजेंद्र गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते. शिबीरासाठी सर्वांचे भाजपा उपाध्यक्ष डॉ. राजेश मढवी फाऊंडेशन व रोटरी ठाणे मीडटाऊन चे अध्यक्ष गौरव कांडलकर यांनी आभार मानले.
