अशोक गायकवाड
रायगड : जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम व जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने २८ जून रोजी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अंबादास देवमाने, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शीतल जोशी- घुगे यांच्या मार्गर्शनाखाली ० ते १८ वयोगटातील बालकांची मोफत तपासणी शिबिर संपन्न झाले.*
या शिबिरात बाल अस्थीरोग तज्ञ डॉ.मुदीत शहा यांनी १७ बालकांची तपासणी केली व बाल मेंदूविकार तज्ञ डॉ.अंकित पांडे यांनी २४ बालकांची पूर्व तपासणी करून पुढील उपचारासाठी संदर्भित केले.
या शिबिरासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानच्या जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. चेतना पाटील, अस्थिरोग तज्ञ डॉ. पंकज पाटील, डॉ. आशिष मिश्रा, आरबीसके समन्वयक सुनील चव्हाण, डीईआयसी व्यवस्थापक गणेश भोसले, सामाजिक कार्यकर्ता ज्ञानदीप भोईर, सायकॉलॉजिस्ट राजेश पवार, भौतिकउपचार तज्ञ प्रतिष्ठा नाखवा, स्पेशल एज्युकेटर सीमा विषे, अधिपरिचारिका, ऐश्वर्या थळे आदींनी सहकार्य केले.
00000
