नवी मुंबई : महानगरपालिका क्षेत्रातील अनाधिकृत व वाढीव बांधकाम करणाऱ्या हॉटेल / बार आणि रेस्टॉरंट / लेडीज बार / पब / लॉज / हुक्का पार्लर यांच्यावरील कारवाई तीव्रतेने राबविण्यात येत असून यापूर्वी अशा प्रकारच्या 59 व्यावसायिकांवर यापूर्वी कारवाई करण्यात आलेली आहे. ही कारवाई महापालिका आयुक्त यांच्या निर्देशानुसार व अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त्‍ डॉ.राहुल गेठे यांच्या नियंत्रणाखाली तशाच तीव्रतेने राबविण्यात येत आहे.
या कारवाई अंतर्गत 3 जुलै रोजी रात्रीपासून 4 जुलैच्या पहाटेपर्यंत तोडक कारवाई करण्यात आली. यामध्ये बेलापूर विभाग कार्यक्षेत्रातील (1) अरुण बार अँड रेस्टॉरंट, (2) साई दर्शन बार अँड रेस्टॉरंट, (3) रेन फॉरेस्ट पब अँड लॉन्च, (4) टर्निंग पॉईंट बार अँड रेस्टॉरंट, (5) सेंटर पॉईंट बार अँड रेस्टॉरंट यांच्यावर कारवाई करण्यात आली.
तसेच तुर्भे विभाग कार्यक्षेत्रातील (1) कल्ट पब अँड लॉन्च, (2) ब्लु स्टार बार ( लेडीज बार ), (3) धनराज बार ( लेडीज बार ), (4) करिश्मा बार ( लेडीज बार) या हॉटेल – रेस्टॉरंट / बारवरही कारवाई करण्यात आली.
या धडक मोहिमेसाठी सहाय्यक आयुक्त श्री. शशिकांत तांडेल, डॉ. अमोल पालवे, श्री.भरत धांडे व त्यांचे अधिनस्त अतिक्रमण विभागाचे अधिकारी / कर्मचारी उपस्थित होते. यापुढेही अशीच तीव्र कारवाई करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *