अशोक गायकवाड
रायगड : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राज्यातील ६५ वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने, उपकरणे खरेदी करणेकरीता मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरु करण्यात आली आहे. मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी अर्ज करणेचे आवाहन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सहाय्यक आयुक्त सुनिल जाधव यांनी केले आहे.
पात्र वृध्द लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थतता/ दुर्बलतेनुसार चष्मा,श्रवणयंत्र, ट्रायपॉड स्टिक, व्हील चेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नि-ब्रेस, लंबर बेल्ट, सर्वाइकल कॉलर इ. सहाय्यभूत आवश्यक सहाय्य साधने/उपकरणे खरेदी करणेकरीता तसेच मन:स्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र इ.द्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत पात्र वृध्द लाभार्थ्यांना रु.३०००/- त्याच्या बँक खात्यात वर्ग करण्यात येतील. सदर योजनेबाबत अधिक माहिती व योजनेचे अर्ज प्राप्त करणेसाठी रायगड जिल्हातील सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण रायगड कच्छिभवन, नमिनाथ जैन मंदिरा जवळ, श्रीबाग रोड, अलिबाग, जि. रायगड ४०२२०१ या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सहाय्यक आयुक्त सुनिल जाधव यांनी केले आहे.
000
