नवी मुंबई: नवी मुंबई महानगरपालिका बी विभाग नेरूळ कार्यक्षेत्राअंर्तगत घर क्र.0105/0001, नेरुळ गाव येथे अंदाजे 15.00 मी X 20 मी मोजमापाचे RCC बांधकाम व घर क्र.0105/0002, नेरुळ गाव येथे अंदाजे 6.00 मी X 10.00 मी मोजमापाचे RCC बांधकाम, कॉलम व फुटींगचे काम अनिधकृतरित्या सुरु होते त्यानुसार त्यांना महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, 1966 चे कलम 54 अन्वये नोटीस बजाविण्यात आली होती. तथापी नोटीसीची मुदत संपुष्टात येऊनही अनधिकृत बांधकाम स्वत:हून हटविण्यात आले नाही.
त्यामुळे, दि. 05.07.2024 रोजी नेरूळ विभागाअंतर्गत सदर ठिकाणी उभारण्यात आलेले अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची संयुक्त कारवाई मा. उप आयुक्त डॉ. राहुल गेठे अतिक्रमण विभाग, नवी मुंबई महानगरपालिका यांचे मार्गदर्शनाखाली अतिक्रमण मुख्यालय पोलीस पथक, सिडको व सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी, नेरूळ, अतिक्रमण विभागातील कर्मचारी यांचे समवेत सुरक्षारक्षक यांच्या मार्फत करण्यात आली आहे.सदर मोहीमेकरीता 18 मजुर, 1 मुकादम, 6 ई-हमर, 2 गॅस कटर व 2 पीकअप व्हॅन वापरण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *