माथेरान : नगरपरिषदेच्या वीर हुतात्मा भाई कोतवाल प्राथमिक शाळेत गुरुवारी दि.४ जुलै रोजीसकाळी अकरा वाजता ई लर्निंग(डिजिटल) वर्गाचे उदघाट्न माथेरान गिरीस्थान नगर परिषदेचे कार्यतत्पर मुख्याधिकारी तथा उत्तम प्रशासक राहुल इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी छोटेखानी भाषणात शाळेच्या शैक्षणिक आलेखावर समाधान व्यक्त करत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना आकार देण्याची महत्वपूर्ण भूमिका हे शाळेतील गुरुजन आत्मीयतेने करत असतात. आजचे विद्यार्थी हेच उद्याचे देशाचे भवितव्य असून विद्यार्थ्यांनी सुध्दा अत्यंत चिकाटीने आणि जिद्दीने अभ्यासक्रमात लक्ष केंद्रित करून शाळेचे त्याचबरोबर शिक्षक आणि पालकांचे नाव उज्जवल करण्यासाठी मेहनत घेतली पाहिजे असे मत प्रशासक राहुल इंगळे यांनी व्यक्त केले. प्रारंभी नगरपरिषदेच्या अभियंता बांगर
यांच्या हस्ते स्त्री शिक्षण पुरस्कारत्या सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा ज्योती शिंदे, मुख्याध्यापक दिलीप आहिरे, सचिन भोईर, अनिश पाटील, साक्षी कदम, मनिषा चौधरी नगरपरिषद कार्यालय लेखापाल अंकुश इचके, सदानंद इंगळे,.जयवंत वर्तक (लिपिक), भारत पाटील (लेखापाल), ज्ञानेश्वर सदगीर आदी उपस्थित होते.
त्यानंतर पालकांची विशेष सभा आयोजित करण्यात आली यावेळी समस्त पालकांना प्रशासक राहुल इंगळे यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक संतोष चाटसे यांनी केले.
०००००
