मुंबई : राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी एकीकडे शिवसेनेने २८८ मतदार संघात उमेदवारांची चाचपणी केल्यानंतर आता काँग्रेसनेही सर्वच्य सर्व २८८ मतदार संघातून इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवून स्वबळाची चाचपणी केली आहे.
येत्या १० जुलैपर्यंत प्रदेश काँग्रेसच्या कार्यालयात हे अर्ज जमा करण्याचे आवाहन एका परिपत्रकातून करण्यात आले आहे. अर्जासोबत सर्वसाधारण उमेदवारांना पक्षनिधी म्हणून 20 हजाररुपये जमा करावे लागणार आहे. तर अनुसुचित जाती, जमाती आणि महिला उमेदवारांना 10 हजार रूपये भरावे लागणार आहेत. एकीकडे राज्यात महाविकास आघाडीत लढायचं ठरलेलं असतांना काँग्रेसचं ‘प्लॅन बी’ वर काम करणं सुरू केलंय का? असा प्रश्न आता राजकीय वर्तुळातू उपस्थित केला जातोय.
