माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची उपस्थिती

 

 

मुरबाड : भाजपा व कपिल पाटील फाऊंडेशनच्या वतीने मुरबाड येथे मंगळवारी विद्यार्थी गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील यांच्या हस्ते दहावी, बारावी आणि शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंतांचा ट्रॉफी व कॉलेज बॅग देऊन गौरव केला जाईल. तसेच अॅड. अदिती निटुरे यांच्याकडून विद्यार्थ्यांना करियर मार्गदर्शन केले जाईल.
मुरबाड येथील माऊली गार्डन येथे मंगळवारी सकाळी १०.३० वाजता हा कार्यक्रम होत आहे. त्यात मुरबाड तालुक्यातून चौथी व सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत पहिल्या तीन क्रमांकाचे गुणवंत विद्यार्थी, तालुक्यातील विद्यालयात दहावी व बारावीमध्ये प्रथम व द्वितीय क्रमांकातील गुणवंत विद्यार्थ्यांना ट्रॉफी व कॉलेज बॅग आणि दहावीत ७५ व बारावीत किमान ७० टक्के गूण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना कॉलेज बॅग देऊन गौरविण्यात येईल. त्याचबरोबर पदवी, पदव्युत्तर परीक्षेतील गुणवंत आणि कला-क्रीडा क्षेत्रातील विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या व्यक्तिमत्वांचा गौरव केला जाणार आहे. या कार्यक्रमात प्रसिद्ध करिअर मार्गदर्शक अॅड. अदिती निटुरे यांच्याकडून विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शनही केले जाणार आहे. इच्छूक विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी एस. एल. पाटील यांच्याबरोबर दूरध्वनी क्र. ९६२३०४१६४७ व एकनाथ खाटेघरे क्र. ८३०८५१७८८८ यांच्याबरोबर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *