अनिल ठाणेकर
ठाणे : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचे अर्ज भरण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, ठाणे शहर (जिल्हा) च्या वतीने मध्यवर्ती कार्यालय, फ्लॉवर व्हॅली कॉम्प्लेक्स, विवियाना मॉल समोर, ठाणे (प.) येथे शनिवार दिनांक ६ जुलै आणि रविवार दिनांक ७ जुलै, २०२४ रोजी दोन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी ९८२ अर्ज जमा तर रविवारी १२०० वर अर्ज जमा झाल्याची माहिती प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिली.
या शिबीरामध्ये पहिल्या दिवशी शनिवारी एकूण ९८२ माता-भगिनींचे अर्ज जमा करुन घेण्यात आले. त्यापैकी १३६ अर्ज ऑनलाईन अपलोड करुन त्यांना पावती देखिल देण्यात आली. आज या शिबीराचा दुसरा दिवस असून आज जवळ-जवळ १२०० वर माता-भगिनींचे अर्ज जमा झाले असून पहिल्या दिवशी आणि दुस-या दिवशी जमा करण्यात आलेले सर्व अर्ज पुढील ४-५ दिवसांमध्ये आमच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमार्फत ऑनलाईन अपलोड केले जातील आणि ऑनलाईन अपलोड केलेल्या अर्जाची पावती संबंधीत माता-भगिनींना कार्यालयातून देण्यात येईल, अशी माहिती देऊन महायुती सरकारने सुरु केलेल्या या योजनेबद्दल सर्व माता-भगिनींनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महिला व बालविकास मंत्री ना. आदिती तटकरे यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते तथा ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी विशेष आभार मानले.
०००००
