उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे बुधवारी पहाटे सव्वा पाचच्या सुमारास आराम बस आणि टँकरच्या धडकेत बसमधील १८ प्रवाशांचा मृत्यू झाला, तर १९ जखमी झाले. मृतांमध्ये १४ पुरुष, २ महिला आणि २ लहान मुलांचा समावेश आहे. ही बस बिहारमधील सिवान येथून दिल्लीला जात होती. लखनौ-आग्रा द्रुतगती मार्गावरील बांगरमाऊ कोतवालीजवळ हा अपघात झाला. ही धडक इतकी भीषण होती की बसच्या चालकाच्या बाजूचा भाग पूर्णपणे वेगळा झाला. प्रवासी बाहेर फेकले गेले. त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. अपघाताचे व्हिडिओ समोर आले आहेत. रस्त्यावर मृतदेह विखुरलेले दिसत आहेत. मृतदेह पाहून एक पोलीस बेशुद्ध पडला. या अपघातात बिहारमधील एकाच कुटुंबातील सहा जणांचा अंत झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *