मुंबई- मराठी व्यावसायिक वाद्यवृंद निर्माता संघ ही संस्था सातत्याने ११ वर्षे वाद्यवृंद निर्माते व कलावंताच्या प्रश्नावर काम करणारी संस्था आहे. सदर संस्थेच्या वतीने बुधवार  दि .१७ जुलैला सायंकाळी ५ वाजता  अण्णाभाऊ साठे नाट्यगृह,  जिजामाता उद्यान  ( राणी बाग ) जवळ भायखळा येथे कलावंताच्या वैद्यकीय मदती करीता विठ्ठल भक्तिपर गीतांचा सांगीतीक कार्यक्रम पाऊले चालती… सादर करीत करणार आहे.
या कार्यक्रमाचे अवचित्य आषाढी एकादशी असल्यामुळे भाविक श्रोत्यांना एक उत्कृष्ट पर्वणी मिळणार आहे. दरम्यान नाट्यगृहामध्ये विठ्ठल मूर्तीचे पुजन दिंडी आणि सांगितिक मेजवानी असणार आहे.
सदर कार्यक्रमात नामांकित वादक , गायक , गायिका कलाकारांचा सहभाग असणार आहे. कार्यक्रमाच्या दरम्यान जेष्ठ वादक,गायक,निवेदक,तत्रंज्ञ यांचा कलागौरव पुरस्कार देवून सन्मानित करण्यात  येणार आहे. वाद्यवृंद  व नाट्यक्षेत्रातील अनेक  मान्यवर  या सोहळ्यात उपस्थिती राहणार आहेत सदर कार्यक्रम  सर्व  रसिकांसाठी विनामूल्य असणार आहे.
००००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *