माथेरान : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ माथेरान मधील समस्त महिला वर्गाला मिळवून देण्यासाठी शिवसेनेचे शहरप्रमुख चंद्रकांत चौधरी यांनी पुढाकार घेतला असून ह्या महत्वपूर्ण कार्यास येथे सोमवार दि.७ पासून सुरुवात करण्यात आली आहे. याकामी चंद्रकांत चौधरी यांनी महिला आघाडीच्या कार्यकर्त्या त्याचप्रमाणे विविध भागांतील विभागप्रमुख आणि कार्यकर्त्यांची फळी तयार करून गावातील प्रत्येक प्रभागात जाऊन महिलांची सदर योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे गोळा केली जात आहेत.त्यामुळे महिला वर्गाने सुटकेचा निश्वास सोडला आहे. घरातील कामे बाजूला सारून ही सर्व कागदपत्रे गोळा करणे हे महिलांना खूपच त्रासदायक होते.त्यासाठी शिवसेनेचे शहरप्रमुख चंद्रकांत चौधरी यांनी पुढाकार घेतला असून युवा सेना, युवती सेना, आजी माजी पदाधिकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभत असल्याने गावातील जवळपास दोन हजार महिलांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी शिवसेनेचे सर्व शिवसैनिक तत्पर दिसत आहेत. यावेळी महिला आघाडीच्या प्रीती कळंबे, अर्चना भिल्लारे, कल्याणी शिंदे, योगिता चौगुले, श्रुतिका दाभेकर यांसह अन्य कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन महिलांकडून कागदपत्रे गोळा करून त्यांना योग्य मार्गदर्शन केले.
000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *