काही लोकांना कॉफी इतकी प्रिय असते की, ते काम करताना, जेवल्यानंतर कवा तासातासाने कॉफीचे सेवन करतात. काही वेळा कामाच्या ठिकाणी लोकांना तासन्तास काम करत बसावे लागते. त्यामुळे काम करत असताना लोक कॉफी पित असतात. कॉफी पित तासनतास बसून काम करणाऱ्या लोकांमध्ये अकाली मृत्यूचा धोका 60 टक्क्यांनी कमी होतो, असा एका अभ्यासाचा निष्कर्ष आहे.
बीएमसी पब्लिक हेल्थ जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासात कॉफी पिण्याचे परिणाम स्पष्ट केले आहेत. जेवणाअभावी तासनतास एका जागी बसून राहावे लागते, अशा लोकांचा यात विशेष उल्लेख करण्यात आला आहे. अमेरिकेतील प्रौढ व्यक्तीवर करण्यात आलेला हा अभ्यास अनेक अर्थांनी खास मानला जातो; तसेच कॉफीप्रेमींसाठीदेखील एक आनंदाची आहे. या अभ्यासात दहा हजारांहून अधिक अमेरिकन प्रौढ व्यक्तीचा समावेश होता. त्यात असे दिसून आले, की कॉफी पिणाऱ्या लोकांच्या तुलनेत कॉफी न पिणाऱ्या लोकांच्या मृत्यूची शक्यता 1.6 पट जास्त असल्याचे समोर आले. दिवसाचा बराचसा वेळ एकाच ठिकाणी बसून घालवतात आणि कॉफी घेत नाहीत, त्यांच्या मृत्यूचा धोका 60 टक्क्यांपर्यंत जास्त असतो.
शरीर सक्रिय ठेवण्यासाठी काही लोकांना कॉफीचे सेवन करायला आवडते. त्यातील अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म खराब जीवनशैलीमुळे होणाऱ्या आजारांचा धोका कमी करतात. दिवसातून दोन कप कॉफी फक्त मेंदू तजेलदार करत नाही, तर मृत्यूचा धोकादेखील कमी करते. शारीरिक हालचाल कमी आहे अशांसाठी ते फायदेशीर ठरू शकते. याचे दीर्घकाळ सेवन केल्याने हृदयविकार आणि टाइप 2 मधुमेहाचा धोकाही कमी होऊ शकतो.
– डॉ. मेघा पठारे
