अशोक गायकवाड
रायगड :
राज्याचे उद्योग मंत्री तथा रायगड जिल्हा पालकमंत्री उदय सामंत हे मंगळवारी रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ११.०० वा. जिल्हा नियोजन समिती सभागृह, नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग येथे रायगड जिल्हा नियोजन समितीची बैठक तर दुपारी १.०० वा. रायगड जिल्हा डोंगरी विभाग विकास समिती बैठक होणार आहे.
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ कार्यक्रम पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत त्यावेळी आर.सी.एफ.हॉल कुरुळ, अलिबाग येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना प्रतिनिधिक स्वरूपात लाभ प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तसेच जिल्हा परिषद सेस निधीतून विविध घटकांना ई शॉप वाहन वितरण करण्यात येणार आहे. सोमवारी पालकमंत्री उदय सामंत हे खेड येथून मोटारीने अलिबागला पोहोचणार असून शासकीय विश्रामगृह, अलिबाग येथे मुक्कामी राहाणार आहेत.
00000
