सुट्टीच्या दिवशीही प्रभागसमितीस्तरावर स्वीकारले जाणार अर्ज

 

 

ठाणे : ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेस महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ही योजना जास्तीत जास्त महिलांपर्यत पोहचावी यासाठी महापालिका कार्यक्षेत्रातील विविध ठिकाणी माहिती देणारे फलकही उभारण्यात आले असल्याची माहिती महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

ठाणे महापालिका क्षेत्रात देखील मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. या महिलांची गैरसोय होवू नये व त्यांना योग्यप्रकारे अर्ज सादर भरता यावा यासाठी महापालिकेने प्रभागसमितीनिहाय मदत कक्ष सुरू केले असून यासाठी एकूण 546 कर्मचारी कार्यरत असून अर्ज वितरण व स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

ठाणे महापालिका मुख्यालय कर्मचारी, अंगणवाडी मदतनीस व सेविकांच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज अपलोड करण्याची कार्यवाही सुरू आहे. तसेच शहरातील आर्थिक दुर्बल घटकातील महिलांना या योजनेची संपूर्ण माहिती तसेच अर्ज भरण्यासाठी आवश्यक असलेले कागदपत्रांची माहिती देण्याचे काम सुरू आहे.

महिलांची गैरसोय होवू नये यासाठी कार्यालयीन वेळेव्यतिरिक्त शनिवारी व रविवारी सुद्धा सदरची मदत केंद्रे सुरू असणार आहे. सकाळी 8 ते दुपारी 2 व दुपारी 2 ते 8 अशा दोन सत्रात अर्ज वितरण व स्वीकृतीचे काम सुरू राहणार आहे. तरी ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील आर्थिक दुर्बल घटकातील गरीब व गरजू महिलांनी या योजनेत जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *