उलवे : भारतात सर्वप्रथम डॉ प्रकाश शेंडगे यांच्या संकल्पनेतून कामगारांसाठी ऑन दी स्पॉट मेडिकल हेल्थ चेक अप करून देण्याची सुविधा साकारली असून याचा मोठ्या प्रमाणात कामगारांना आणि कंपनी चालकांना फायदा होणार असून अतिशय वाजवी दरात हि सुविधा देण्याचे काम ओम गगनगिरी हॉस्पिटल हेल्थ सर्व्हिस च्या माध्यमातून डॉ प्रकाश शेंडगे हे देणार असून आज उलवे येथील या हेल्थ सर्व्हिस चे उदघाटन केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रदेश सदस्य सुमित मोरे ,नवी मुंबई चे माजी महापौर सुधाकर सोनावणे ,नवी मुंबई रिपाई रिपाई अध्यक्ष महेश खरे ,रायगड जिल्हा अध्यक्ष नरेंद्र गायकवाड ,पनवेल महानगर पालिका अध्यक्ष प्रभाकर कांबळे ,प्रभारी जिल्हाध्यक्ष मोहनीश गायकवाड रिपाई नेते मोहन गायकवाड आदी मान्यवर उपस्स्थित होते

डॉ प्रकाश शेंडगे यांच्या संकल्पनेतून कामगारांची आरोग्य तपासणी शासन नियमानुसार बंधनकारक असल्याने मात्र एकाच वेळी शेकडो कामगारांची तपासणी करण्यास वेळ जाऊन कंपनीच्या कामावर याचा परिणाम होतो ,कंपनीचा आणि कामगारांचा वेळ वाचवण्यासाठी आणि कामगारांची नियमित आरोग्य तासापासणी करण्यासाठी ओम गगनगिरी हॉस्पिटल च्या माध्यमातून चेक अप बस च्या माध्यमातून जागेवर जाऊन कामगारांची विविध आरोग्य चाचणीची तपासणी करण्याची संकल्पना आणली असून उलवे येथे आज तिसरे युनिट स्थापन करण्यात आले या युनिट चे उदघाटन केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आले .

यावेळी रामदास आठवले यांनी आपल्या शैलीत जर आपल्याला ठेवायची असेल आपली तब्येत बरी तर आपल्यासाठी आहे ओम गगनगिरी ,कामगारांची ,गरिबांची तपासणी करण्यासाठी मोठ्या हॉस्पिटल ला जाऊन खूप पैसे लागतात मात्र डॉ शेंडगे यांनी वाजवी दरात ओम गगन गिरी हॉस्पिटल च्या माध्यमातून गगनगिरीचे डॉ शेंडगे देत आहेत कर्नाटक ,महाराष्ट्रात डॉ शेंडगेंचे काम सुरु आहे त्यांची मदत होईल असे रामदास आठवले यांनी यावेळी सांगितले.

00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *