अशोक गायकवाड

 

 

रायगड :

उमेदवारांना उद्योजकाकडे प्रत्यक्ष कार्यप्रशिक्षणाद्वारे रोजगारक्षम करणे, या उद्देशाने मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना प्रस्तावित असून जिल्ह्यातील सर्व इच्छूक उमेदवार,आस्थापना, उद्योजक यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे अवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केद्राच्या सहायक आयुक्त अमिता पवार यांनी केले आहे.*

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेकरीता रु.५ हजार ५०० कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे स्वरूपः-उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ कार्य प्रशिक्षण (इंटर्नशिप) द्वारे उपलब्ध करून देण्यात येईल. या संकेतस्थळावर बारावी, आय.टी.आय.,पदविका, पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण केलेले रोजगार इच्छुक उमेदवार ऑनलाईन नोंदणी करू शकतील. विविध क्षेत्रातील मोठे प्रकल्प, उद्योग/स्टार्टअप्स, विविध आस्थापना इ. यांना आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची मागणी ऑनलाईन नोंदवतील. सुमारे १० लाख कार्य प्रशिक्षण (इंटर्नशिप) च्या संधी प्रत्येक आर्थिक वर्षात यायोजनेच्या माध्यमातून उपलब्ध होतील. सदर कार्य प्रशिक्षण (इंटर्नशिप) चा कालावधी ६ महिने असेल व या कालावधीसाठी उमेदवारांना या शासनामार्फत विद्यावेतन देण्यात येईल.दर विद्यावेतन लाभार्थ्यांच्या थेट बैंक खात्यात (DBT) जमा करण्यात येईल.

आस्थापना/उद्योजकासाठी पात्रता :- आस्थापना / उद्योग महाराष्ट्र राज्यात कार्यरत असावा.आस्थापना / उद्योजकाने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी,आस्थापना / उद्योगाची स्थापना किमान ३ वर्षपूर्वीची असावी. आस्थापना / उद्योगांनी EPF, ESIC, GST, Certificate of incorporation, DPIT व उद्योग आधारची नोंदणी केलेली असावी,

उमेदवारांची पात्रता :-उमेदवाराचे किमान वय १८ व कमाल ३५ वर्ष असावे.उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता १२ वीपास/ आयटीआय/पदविका/पदवीधर / पदव्युत्तर असावी.उमेदवार हा महाराष्ट्राचा अधिवासी असावा.उमेदवाराचे आधार नोंदणी असावी.उमेदवाराचे बैंक खाते आधार संलग्न असावेउमेदवाराने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी. शैक्षणिक अर्हतेप्रमाणे विद्यावेतनाचे विवरण पुढील प्रमाणे असेल :- १२ वी पास प्रति माह विद्यावेतन रु.६, हजार, आय.टी.आय/ पदविका, प्रति माह विद्यावेतन रु.८ हजार, पदवीधर/पदव्युत्तर प्रति माह विद्यावेतन रु.१० हजार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *