राजीव चंदने

 

 

मुरबाड : शहरातील ऐतिहासिक प्राथमिक जि.प. मुलींची शाळा, अर्थात कन्या शाळा म्हणुन ओळख असलेल्या शाळेत ५१० विद्यार्थी शिक्षण घेत असताना त्या शाळेत गेल्या अनेक वर्षांपासून पिण्याचे पाणी तसेच स्वच्छता गृहाची समस्या सोडविण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याने शिक्षण विभागाच्या कारभारावर विद्यार्थी पालक वर्गात संताप व्यक्त केला जात आहे.
शासन मुलींना मोफत शिक्षण देण्याची घोषणा करत असले तरी मुरबाड शहरातील ऐतिहासिक असलेल्या कन्या शाळेची इमारत तोडुन त्या ठिकाणी उंच मनोरा उभारण्यात आला असला तरी इयत्ता ८वी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या व ५१० विद्यार्थ्यांना असलेल्या या शाळेतील विद्यार्थ्यांना मुलभूत सुविधा पुरविण्यात शिक्षण विभागाला अपयश आल्याने या शाळेतील विद्यार्थी आरोग्य, पिण्याचे पाणी या सुविधा नसल्याने विद्यार्थ्यांना पिण्याचे पाण्यासाठी घरुनच दप्तरात बाटली आणावी लागते तर स्वच्छता गृहाची दुरावस्था, संरक्षण भिंत,किचन शेडचे अपुर्ण बांधकाम यामुळे मोठी कुचंबना सहन करावी लागते.दरम्यान विद्यार्थी हे सहन करतात.परंतु हिच समस्या शिक्षक वर्गाला देखील सतावत आहे.सदरची शाळा हि मुरबाड नगरपंचायतचे कार्यक्षेत्रात येत असल्याने या शाळेतील विद्यार्थ्यांची समस्या जिल्हा परिषद.पंचायत समिती या सपशेल अपयशी ठरल्याने एखादी सामाजिक संस्था किंवा दानशूर व्यक्तींनी सढळ हाताने मदत करुन विद्यार्थ्यांची पिण्याचे पाणी व स्वच्छता गृह तसेच इतर मुलभूत समस्या पासून सुटका करावी अशी मागणी पालक वर्गात कडून होत आहे.
मुरबाड शहरातील कन्या शाळा हि ऐतिहासिक असुन या शाळेतील विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी पालक वर्ग वेळोवेळी शाळा व्यवस्थापन कमिटी कडे पाठपुरावा करत आहे.परंतु शाळा व्यवस्थापन कमिटी सह प्रशासकीय यंत्रणा हि बघ्याची भूमिका घेत असल्याने येत्या आठ दिवसांत या समस्येचे निवारण झाले नाही तर या शाळेला पालकांकडून टाळे ठोकण्यात येईल.विजय रमाकांत मोहिते.पालक.
0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *