जितेंद्र आव्हाड यांना धक्का !
अनिल ठाणेकर
ठाणे : मुंब्रा- ळवा विधानसभा मतदार संघामध्ये आमदार जितेंद्र आव्हाड यांना मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार गटातील अनेक नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, प्रदेश सरचिटणीस, अल्पसंख्यांक निरीक्षक नजीब मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील झाले आहेत.
कळव्यातील विरोधी पक्षनेते तथा नगरसेवक प्रकाश बर्डे, नगरसेविका रिटा यादव, परिवहन समिती सदस्य तकी चेऊलकर, समाजसेवक राजनाथ यादव आणि मुंब्र्यातील नगरसेविका रुपाली गोटे, नगरसेविका आशरीन राऊत, समाजसेवक इब्राहिम राऊत, नगरसेवक शेख जफर नोमानी, नगरसेविका हफिजा नाईक, समाजसेविका नेहा नाईक, समाजसेवक काफील शेख, नगरसेविका अन्सारी साजिया परवीन सर्फराज, समाजसेवक राजू अन्सारी, समाजसेवक सर्फराज अन्सारी, नगरसेविका हसीना अब्दुल अजीज शेख, समाजसेवक अजीज शेख, मुमताज शाह, मेहफूज (मामा) शेख, सय्यद शमविल यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रदेश प्रवक्ते तथा ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, प्रदेश सरचिटणीस तथा अल्पसंख्यांक निरीक्षक नजीब मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी नगरसेवक शेख जाफर नोमानी यांची मुंब्रा-कळवा विधानसभा अध्यक्षपदी, मुमताज शाह यांची जिल्हा सरचिटणीस, मुंब्रा-कळवा प्रवक्ते पदी, मेहफूज (मामा) शेख यांची शीळ डायघर ब्लॉक अध्यक्ष पदी, सय्यद शमवील याची राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या मुंब्रा-कळवा विधानसभा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. या प्रसंगी नगरसेविका वहिदा खान, अंकिता शिंदे आणि मुंब्रा-कळव्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
००००
