Slug- ‘उद्धव ठाकरेंनी निवडणूकीसाठी पैसे मागितलेआदित्यने बलात्कार केल्याचा आरोप करण्यासाठी फडणवीसांची मला ऑफर होती

मुंबई : माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री आणि विद्यमान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आज आरोपांचा बॉम्बगोळा टाकला.  मला उद्धव ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीसाठी पैसे मागितले असं आरोप करण्यास सांगण्यात आलं होतं.. मी तो आरोप केला नाही. तसेच आदित्य ठाकरे यांनी दिशा सालियानवर बलात्कार करून बाल्कनीतून ढकलून दिल्याचा आरोप सुद्धा करण्यास सांगण्यात आले, पण मी ते आरोप केले नाहीत, हे आरोप केल्यास माझी जेलमधून सुटका करण्याची फडणवीसांची आरोप होती असा खळबळजनक दावा अनिल देशमुख यांनी केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी पाठवलेल्या एका खास माणसाने मला तीन वर्षांपूर्वी ही ऑफर दिली होती. माझ्या शासकीय निवासस्थानीच ही ऑफर मला देण्यात आली होती असा दावाही अनिल देशमुख यांनी केला. ही ऑफर मला देण्यात आली त्या संदर्भातले भक्कम पुरावे माझ्याकडे असून मी योग्य वेळी ते समोर आणेन, असं अनिल देशमुख म्हणाले. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या श्याम मानव यांनी केलेले आरोपांमध्ये तथ्य असल्याचेही अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.

अनिल देशमुख म्हणाले की, मला अनिल परब यांच्या विरोधातही आरोप करण्यास सांगण्यात आले होते. अजित पवारांबद्दल गुटखा व्यावसायिकांच्या संदर्भात आरोप करण्यास सांगण्यात आले होते. मी हे काहीही केलं नाही म्हणूनच मला 13 महिने तुरुंगात राहावं लागलं असा खळबळजनक दावा अनिल देशमुख यांनी एबीपी माझाशी बोलताना केला. दरम्यान जेव्हाही ऑफर अनिल देशमुख यांना देण्यात आली, तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस एकसंघ होती त्यामुळे अशा ऑफरबद्दल तुम्ही शरद पवार आणि अजित पवार यांना कल्पना दिली होती का? या प्रश्नावर मात्र अनिल देशमुख यांनी मौन बाळगले. वारंवार विचारणा करूनही त्यांनी या प्रश्नाचे उत्तर दिलं नाही. दरम्यान, अशी ऑफर देवेंद्र फडणवीस यांच्या खास माणसाकडून देण्यात आली होती याचा पण पुनरुच्चार मात्र त्यांनी केला.

दरम्यान, “संविधान वाचवा, महाराष्ट्र वाचवा” असं अभियान राबवून महाराष्ट्रातील अनेक सामाजिक व पुरोगामी संघटना विधानसभा निवडणुकीत ठोस भूमिका स्वीकारण्याच्या तयारीत आहेत.  श्याम मानव यांच्या अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आज (24 जुलै) यासंदर्भात नागपूरातील विनोबा विचार केंद्रात महाराष्ट्रातील विविध सामाजिक व पुरोगामी संघटनांची एक प्राथमिक बैठक बोलावली आहे. श्याम मानव यांनीही अनिल देशमुख यांच्या आरोपांना पृष्टी दिल्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *