नवी मुंबई : महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम 1966 चे कलम 54 अन्वये नोटीस देऊनही संबंधितांनी नोटीशीची दखल न घेतल्यामुळे अनधिकृत बांधकामांविरोधात नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभागामार्फत आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे निर्देशानुसार व अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त डॉ. राहुल गेठे यांच्या नियंत्रणाखाली विविध विभागांत एकाच वेळी तोडक कारवाई धडकपणे राबविण्यात आली.
यामध्ये बेलापूर विभागात शहाबाज गांव येथे महेश कुंभार यांचे 7 गाळे व घराचे अतिरिक्त बांधकाम हटविण्यात आले. तसेच रविंद्र वाघमारे यांचे 8 गाळेही तोडण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे.
तुर्भे विभागातील सेक्टर 5 सानपाडा येथील वासुदेव रामचंद्र पाटील यांच्या घर क्र. 568 येथील आर.सी.सी, बांधकामावर तोडक कारवाई करण्यात आलेली आहे.
कोपरखैरणे विभागातील दिलीप वसंत पाटील, घर क्र.1026, से.4 ए, कोपरखैरणे तसेच आत्माराम लक्ष्मण येडगे, घर क्र.1035, से.4 ए, कोपरखैरणे यांच्या अनधिकृत बांधकामांवरही धडक कारवाई करण्यात आलेली आहे. घणसोली विभागातही जयश्री शाम शिंदे यांचे वाढीव 6 व्या मजल्याच्या बांधकामवर तोडक कारवाई करण्यात आली आहे. तसेच दत्तनगर, घणसोली येथील सोनु भोलेकुमार गुप्ता यांच्या आर.सी.सी कॉलम व प्लिन्थच्या अनधिकृत बांधकामावर तोडक हातोडा पडलेला आहे. ऐरोली विभागात दिवागाव येथे मासळी मार्केटच्या मागील बाजूस सुरू असलेले सागरनाथ रामा मढवी, घर क्र.30, यांचे आर.सी.सी इमारतीचे 3, 4 व 5 माळ्याच्या बांधकामावर धडक कारवाई करण्यात आलेली आहे.
अशाप्रकारे एकाच दिवसात विविध विभागांमध्ये आठ अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाईचा बडगा उगारण्यात आला असून ही कारवाई यापुढील काळात अशीच तीव्रतेने राबविण्यात येणार आहे.
महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे निर्देशानुसार, उपआयुक्त डॉ. राहुल गेठे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभाग मुख्यालय सहाय्यक आयुक्त डॉ.अमोल पालवे तसेच बेलापूर विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. शशिकांत तांडेल व अभियंता श्री. मयुरेश पवार, तुर्भे विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. भरत धांडे व अभियंता श्री. अमित पवार, कोपरखैरणे विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री.सुनिल काठोळे व अभियंता श्री. सचिन नामवाड, घणसोली विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री.संजय तायडे व अभियंता श्री.रोहित ठाकरे, ऐरोली विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री.अशोक अहिरे व कनिष्ठ अभियंता श्री.राज नागरगोजे यांच्या उपस्थितीत या धडक कारवाया करण्यात आल्या. या मोहीमेसाठी पोलीस बंदोबस्तात आवश्यक मजूर, पोकलन, गॅस कटर, ब्रेकर, जेसीबी इत्यादींचा वापर करण्यात आला.
००००
