राष्ट्रीय लोकअदालतला उत्तम प्रतिसाद

 

 

मुंबई : राष्ट्रीय लोकअदालत कार्यक्रमांला मुंबईतील लघुवाद न्यायालयात उत्तम प्रतिसाद मिळाला असून मुंबई येथील मुख्य शाखा आणि वांद्रे शाखा अशी मिळून एकूण २५४ पैकी ३२ प्रकरणं निकालात निकाली आहेत. त्यामुळे अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या खटल्यातील न्यायप्रक्रियेतील कार्याला या उपक्रमामुळे गती येत असल्याचे दिसून येत आहे.
लघुवाद न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश श्रीकांत एल आणेकर, अतिरिक्त मुुख्य न्यायाधीश एम. एन. सलीम व श्रीमती ए. एस. खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकअदालतचे काम यशस्वी झाले. न्यायाधीश एस. एन. गोडबोले, ए. जे. फटाले, वकील उषा गुप्ता, उज्वला घोडेस्वार यांनी लोकअदालतीचे काम पाहिले. लोकअदालतीचे यशस्वी आयोजन अप्पर प्रबंधक आर. के. हजारे, आर. के. कुळकर्णी आणि कर्मचारी वृंद यांनी केले.
०००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *