मराठमोळ्या गोविंदाचे रूपांतर स्पोर्ट्समध्ये स्वप्न पूर्ण- प्रताप सरनाईक
अनिल ठाणेकर

 

 

ठाणे :  ‘मी स्वप्न पाहिलं होते की आपला मराठमोळ्या गोविंदाचे रूपांतर स्पोर्ट्समध्ये व्हावे ही इच्छा युवासेना कार्याध्यक्ष तथा प्रो गोविंदा लीग अध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांच्या नेतृत्वात प्रो गोविंदाच्या माध्यमातून पूर्ण होत आहे याचे समाधान वाटते,’ असे मत आमदार प्रताप सरनाईक याप्रसंगी यांनी व्यक्त केले. तर प्रो गोविंदा खेळाचे व्यावसायिकीकरण तसेच या खेळाला प्रोफेशनल टच मिळावा यासाठी आज अलॅाटमेंट प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. या माध्यमातून गोविंदा खेळाला नक्कीच प्रतिष्ठा प्राप्त होईल व खेळाडूंमध्ये आत्मविश्वास दृढ होईल असा विश्र्वास प्रो गोविंदा लीगचे अध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांनी व्यक्त केला.
प्रो गोविंदा सीझन-२ मध्ये अंतिम फेरीत निवड झालेल्या १६ संघांचे नामकरण व जर्सी अनावरण सोहळा ताज लँड्स एंड हॉटेल, बांद्रा मुंबई येथे पार पडला. यावेळी आमदार प्रताप सरनाईक, प्रो गोविंदा लीगचे अध्यक्ष पुर्वेश सरनाईक, डोम सिनेयुग कंपनीचे संचलाक अध्यक्ष मोहम्मद मोरानी, डोम एन्टरटेन्मेंटचे व्यवस्थापकीय संचालक मजहर नाडियादवाला आदी मान्यवर उपस्थित होते. गोविंदा या खेळाला राष्ट्रीय दर्जा प्राप्त व्हावा त्याचप्रमाणे या खेळाचे व्यावसायिकीकरण व्हावे यासाठी प्रो गोविंदा स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. ज्या प्रमाणे क्रिकेट, कबड्डी खेळाला व्यासपीठ मिळून हा खेळ मोठा झाला. त्याचप्रमाणे गोविंदा या मराठमोळा खेळाला मोठं करण्यासाठी व त्याला हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी मागील दोन वर्षांपासून आमदार प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने व प्रो गोविंदा लीगचे अध्यक्ष पुर्वेश नेतृत्वात प्रो गोविंदा स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यंदा प्रो गोविंदा सीझन २ मोठ्या जल्लोषात १८ ऑगस्ट, २०२४ रोजी वरळी येथील NSCI डोम येथे होणार आहे. प्रो गोविंदा सीझन २ साठी १६ संघांची निवड करण्यात आली. या संघांचे नामकरण, अलॅाटमेंट प्रक्रिया आज पूर्ण करण्यात आली तसेच १६ संघांच्या जर्सीचे अनावरणही करण्यात आले. आयपीएल प्रमाणे प्रत्येक संघ एक एक मालकाने निवडला असून पुढील सीझनपर्यंत हे संघ या मालकांकडे राहणार आहेत.
चौकट
गोविंदा पथकाचे नाव व मालक यांची यादी पुढीलप्रमाणे
१.  कोकण नगर (कोकण गिन्ट्स) – डॉ. नलीन गुप्ता
२. जय जवान (सातारा सिंघम) – श्री. प्रतीक शेळके
३. यश गोविंदा पथक ( लातूर लेजेण्ड्स)  – श्री. विनय चौघ
४. श्री आग्रेश्वर गोविंदा पथक (नाशिक चॅलेंजर)  –  श्री. अजित सिंग मित्रा
५. शिव गणेश गोविंदा (संभाजी नगर रॉयल) – श्री. विजय पटेल
६. हिंदू एकता गोविंदा पथक (रायगड रॉयल) – श्रीमती अनुष्का गुप्ता आणि श्री. रोहन गुप्ता
७. ओम ब्रह्मांड साई गोविंदा ( सेट्रल मुंबई) – श्री. चंद्रेश विठलानी
८. ओम साई सेवा मंडळ ( नवी मुंबई स्ट्राईकर) – श्री. अर्जुन कंधारी
९. बाल उत्सव गोविंदा ( मिरा भाईंदर योद्धा) – श्री. सिद्धेश कदम
१०. विघ्नहर्ता गोविंदा पथक (पुणे पँथर) – श्री. हरमीत आणि मनमित
११. अष्टविनायक गोविंदा पथक (अमरावती ग्लाडीटर्स)
१२. बालवीर गोविंदा पथक (कोल्हापूर किंग) श्री. मोहित सिंघल
१३. शिव साई क्रीडा मंडळ (नागपूर निन्जा) – श्री. विजय जैन
१४. आर्यन्स गोविंदा पथक ( ठाणे टायगर) – श्री. गोपाळ लालवाणी
१५. साईराम गोविंदा पथक (बारामती ब्लास्टर) – श्री. धीरज जेठानी
१६. हिंदमाता गोविंदा पथक (वेस्टर्न मुंबई) – श्री. भावेश शेठ
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *