जरांगेंचा नारायण राणेंसह राम कदमांना इशारा

बीड : राज्यातील मराठा आरक्षणाचा  प्रश्न सोडवण्यासाठी समाजम्हणून आपल्यालच निवडणूकीच्या रिंगणात उतरावे लागेल. ज्यांना निवडणूक लढवायची आहे त्यांनी कागदपत्रांची तयारी ठेवा. ठरलेल्या एकाच उमेदवाराच्या पाठीमागे समाजाने उभे राहायचं असा आवाहन करतानाच मनोज जरांगे यांनी भाजपा आमदार राम कदम आणि खासदार नारायण राणे यांनाही इशारा दिलाय. राम कदम यांचा दहीहंडी आमदार म्हणून उल्लेख करत प्रकाश आंबेडकरांसह नारायण राणेंनाही त्यांनी चांगलंच फटकारले. विधानसभेत कोणाला पाडायचं हे 29 ऑगस्ट ला ठरवणार असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा सांगितले.

‘मराठवाड्यात जाऊन एकदा बघतोच मनोज जरांगे काय करतात’, असं नारायण राणेंनी म्हटल्यानंतर मनोज जरांगे यांनी आज त्यांना प्रत्युत्तर दिलंय. मी दादांना म्हटलंच नाही मराठवाड्यात यायचं नाही. तुम्ही काय बघून घेणार. मी जर समजा म्हणलोच तर तुमचं कोकणात जाणं ही अवघड होईल असं मनोज जरांगे म्हणाले.

आमदार राम कदम यांनी कशाला यात उडी घ्यावी असं म्हणत रात्रंदिवस हे भाकरी खात नाही ताकच पितेत. मी स्वाभिमान गहाण ठेवून पक्षासाठी काम करणारा त्यांच्यासारखा नाही. मला माझा मराठा मोठा करायचा आहे हे मी ठरवलंय. असे जरांगे म्हणाले.

कुणबींनी मराठ्यांपासून सावध रहा असं आंबेडकरांनी म्हटल्यानंतर मी माझा आरक्षण ओबीसी मधूनच घेणार असं म्हणत त्यांनी प्रकाश आंबेडकरांना उत्तर दिलं. दरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी आरक्षणाला 100% धोका असल्याचे म्हटले. कुणबी मराठा हे खरे ओबीसी नाहीत . त्यामुळे त्यांच्यापासून सावध राहा. विधिमंडळ सभागृहात 190 कुणबी मराठा आमदार असून केवळ 11 ओबीसी आमदार आहेत त्यामुळे ओबीसी आरक्षणाला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *