अनिल ठाणेकर

 

 

ठाणे : जनरल मजदूर सभेचे सरचिटणीस संजय वढावकर यांच्या नेतृत्वाखाली बेक केमिकल प्रा. लि., एम.आय.डी.सी., धाटाव, रोहा या कंपनीतीलकामगारांना रुपये १२,०००/- ते १५,०००/- एवढा भरघोस पगारवाढीचा करार पार पडला. तसेच २० कंत्राटी कामगारांना ३ वर्षात पर्मनंट करण्यात संजय वढावकर यांना यश आले आहे. यासाठी कंपनीतील कंत्राटदार भोकटे यांनी मोलाचे योगदान दिले.
जनरल मजदूर सभेचे सरचिटणीस संजय वढावकर यांच्या नेतृत्वाखाली झालेला हा करार १ एप्रिल २०२२ पासून ३१ मार्च २०२५ या कालावधीसाठी लागू राहणार आहे. या करारानुसार कामगारांना पहिल्या वर्षी रुपये ७०२०, दुसऱ्या वर्षी रुपये २३४० व तिसऱ्या वर्षी रुपये २३४० मिळणार आहे. तसेच, बोनस अनुक्रमे प्रत्येकवर्षी २०२२ साठी ३०,०००/-, २०२३ साठी ३३,०००/-, २०२४ साठी ३५,०००/- वार्षिक प्रवास भत्ता, उच्च शिक्षणासाठी कर्ज, घर दुरुस्तीसाठी कर्ज, लग्नासाठी कर्ज, एनर्जी ड्रिंक, पिकनिकचा खर्च, सणानिमित्त कर्ज, यामध्ये वाढ तसेच, मेडिक्लेममध्ये रुपये ८०,००० वाढ, मेडिक्लेम खर्च १,८०,००० पेक्षा जास्त झाले तर रुपये २०,०००/- अधिक व अनेक फायदे कामगारांना मिळणार आहेत.या करारावर संघटनेच्यावतीने सरचिटणीस श्री. संजय वढावकर, अध्यक्षा संज्योत वढावकर, उपाध्यक्ष शामकांत जोशी, सेक्रेटरी जगदीश उपाध्याय, संघटक सचिव सुहास खरिवले व कंपनीच्या वतीने एक्स्क्युटीव्ह डायरेक्टर श्री. जयेश शाह, चीफ फायनान्स ऑफिसर श्री. अनिल वोरा, डायरेक्टर श्री. मिलिंद राजूरकर, डी.जी.एम. प्रोडक्शन/फॅक्टरी हेड श्री. समीर पवार, जनरल एच. आर. मॅनेजर श्री. अतुल आठवले, ए.जी.एम.-इंजिनीअरिंग अँड मेंटेनन्स श्री. राहुल तलाठी तसेच कामगार प्रतिनिधी परशुराम महाबळे, सुर्यकांत शिगवण, विशाल चौलकर, तुकाराम शिंदे, राजेश बामुगडे यांनी सह्या केल्या, अशी माहिती संघटनेचे खजिनदार प्रशांत शेट्ये यांनी दिली.
रोहा औद्योगिक क्षेत्रातील मे. बेक केमिकल प्रा. लि., या कंपनीत जनरल मजदूर सभा, ठाणे ही मान्यताप्राप्त युनियन जवळ जवळ ३० वर्षे नेतृत्व करत असून, प्रदीर्घ वाटाघाटीनंतर प्रतिकूल परिस्थितीत अतिशय परिश्रमानंतर प्रत्येक कायम कामगारास रु. १३,२००/- अशी भरघोस पगारवाढ मिळविण्यात युनियनला यश आले आहे. कारखान्यातील सर्व कामगारांनी त्याबद्दल युनियनचे जनरल सेक्रेटरी संजय वढावकर यांचे आभार मानले आहे. युनियनने काही महिन्यांपासून व्यवस्थापनाबरोबर वाटाघाटी सुरु केल्या व हा यशस्वी करार नुकताच संपन्न झाला. या कराराचे फायदे या कंपनीतील ५० कामगारांना मिळणार आहेत. ही भरघोस पगारवाढ मिळाल्यामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *