अनिल देशमुखांसोबत जयंत पाटीलही पापात सामील असल्याचा खळबळजनक आरोप
मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे गृहमंत्री असताना त्यांनी जी पापे केली त्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचाही समावेश होता असा खळबळजनक दावा सचिन वाझे यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केलेल्या पत्रात केला आहे. वाझे यांच्या या लेटरबॉम्ब मुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
अनिले देशमुख गृहमंत्री असताना जयंत पाटील यांनी अवैध काम करुन घेतले. एवढच नाही तर चांदीवाल समितीत मी जबाब देत असताना माझ्यावर अनिल देशमुख दबाव आणत होते असा आरोप वाझेने केले आहे. आपल्या पत्रात सचिन वाझे यांनी लिहिले आहे की, मी मुंबई पोलिस दलातील गुप्तवार्ता विभागाच्या प्रमुखपदी असाताना अवैध हुक्का पार्लर आणि भारतातील सर्वात मोठ्या वितरकास अटक केली होती. अटक केल्यानंतर जयंत पाटील यांच्या शासकीय बंगल्यावरून आरोपींना सोडण्याबाबत आणि त्या बदल्यात दुसऱ्याला अटक करण्याबाबत मला फोन आला होता. असा दावा वाझेंनी केला आहे. वाझेनी या आरोपाची ऑडिओ रेकॉर्डिंगही असल्याचा दावा केला असून सीडीआर द्वारेही माहिती समोर येईल असं म्हटलं आहे.
न्यायमूर्ती चांदीवाल चौकशी अहवाल हा महाविकास आघाडीच्या कार्यकाळात आला होता. या चांदीवाल समितीसमोर जबाब देत असताना माझ्यावर अनिल देशमुख दबाव आणत होते असा आरोप वाझेने केला आहे.
तसेच सचिन वाझेने नवीन मोठा खुलासा केला आहे. ठाणे पोलिस निरीक्षक विजय देशमुख यांना लिहिलेले पत्र सचिन वाझेच्या पत्रासोबत जोडलेले दुसरे पत्र समोर आले आहे. पोलिस निरीक्षक विजय देशमुख यांच्या बदली करता 25 लाख रुपये घेतले होते. सुखदा या निवासस्थानी 25 लाख रुपये घेतले होते. पैसे परत न केल्यास आमरण उपोषण करण्याचे पत्र विजय देशमुख यांनी दिले होते . पोलिस निरीक्षक विजय देशमुख ठाणे येथे कार्यरत होते. पत्रात पुन्हा एकदा शरद पवार, अनिल देशमुख आणि जयंत पाटील यांचा उल्लेख केला आहे.अनिल देशमुख यांच्या दबावाखाली येऊन अनेक अवैध कामे केली आहे.
