कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांसमवेत
ठाणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी कळवा – मुंब्रा विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांसमवेत संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांना तसेच कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या प्रचार कामाबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी शिवसेना राज्य समन्वयक, प्रवक्ते नरेश म्हस्के, जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, दिवा शहर प्रमुख रमाकांत मढवी, उमेश पाटील, राजेंद्र साप्ते, नरेंद्र शिंदे, जिल्हा महिला संघटक लता पाटील, प्रियंका पाटील अनिता गौरी यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी उपस्थित होते.
आपल्या कळवा – मुंब्रा शहरात गेल्या दशकभरात अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्णत्वास गेले आहेत. रस्त्यांचे काँक्रीटीकरण, आरोग्य सुविधा, वाहतूक सुविधा वेगवान करण्यासाठी उड्डाणपूल यांसह विविध सुविधा उभारण्यात आल्या. मुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ही सर्व विकासकामे पूर्णत्वास गेली तर अनेक कामे प्रगतीपथावर आहेत. यामुळे या सर्व कामांचा लेखाजोखा आपल्याला नागरिकांसमोर अगदी सकारात्मक आणि प्रभावी पद्धतीने आता मांडायचा आहे. यासाठी सर्वांनी एकत्रित रित्या काम करण्याचे सर्वांना यावेळी आवाहन केले. आपण केलेली जनहिताची कामे, विकास प्रकल्प तसेच शिवसेनेच्या वतीने करण्यात आलेली अनेक कामे नागरिकांपर्यंत पोहचवा, असे आवाहनही यावेळी उपस्थित शिवसैनिकांना केले.
