अकोला : मराठा समाजाचा ओबीसी आरक्षणामध्ये कायदेशीररित्या समावेश होऊ शकत नाही, तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या सगेसोयरे या मागणीला देखील आमचा विरोध असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहिर केले आहे. कुणबी हा ओबीसीत आहे. त्यामुळे त्यांनी जर कागदपत्र दाखल केले तर त्यांना आरक्षण मिळू शकेल, असेही ते यावेळी म्हणाले.
राज्यभरात ओबीसी समाजाच्या ज्या संघटना आहे त्यांच्याशी आम्ही चर्चा करून त्यांचे मत जाणून घेणार आहोत. तसेच ओबीसी समाजाच्या आरक्षणासंदर्भात आम्ही राजकीय पक्षांना आपली भूमिका घेण्यासाठी भाग पाडणार आहोत. कारण आरक्षणाच्या या लढाईत राजकीय भूमिका महत्त्वाची असून त्यांनी एकदा आपली भूमिका स्पष्ट केल्यावर हे संपूर्ण चित्र स्पष्ट होईल. ओबीसी समाजाच्या आरक्षणामध्ये मराठा समाज हा कायदेशीर रित्या समावेश होऊ शकत नाही. त्यामुळे गरीब मराठ्यांनी आम्हाला सत्तेत बसावावं. असा आव्हान देखील प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
सध्या ओबीसी-मराठा संघर्ष बघायला मिळत आहे. तोच संघर्ष विधानसभेत देखील पाहायला मिळेल. मनोज जरांगे यांनी 14 तारखेला त्यांची यादी जाहीर करावी. त्यांनी यादी जाहीर केली म्हणजे गरीब मराठ्यांना न्याय मिळायला सुरुवात होईल असं मी मानतो. हा संघर्ष कसा असेल याच वर्णन मी करू करू शकत नसल्याचेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
