मुंबई : दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे रविवार, दिनांक २४ आणि २५ ऑगस्ट २०२४ या दिवशी सकाळी ९.३० वाजता तबला वादन स्पर्धा आयोजित केल्या आहेत. या स्पर्धा दोन वयोगटात घेतल्या जातील. या स्पर्धा अव्यावसायिक कलाकारांसाठी आहेत. शनिवार २४ ऑगस्ट या दिवशी छोटा गट (१० ते १५ वर्षे) आणि रविवार २५ ऑगस्ट या दिवशी मोठा गट (१६ ते २५ वर्षे) या स्पर्धा घेतल्या जातील. प्रवेश अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख २२ ऑगस्ट २०२४ आहे. प्रवेश अर्ज संस्थेच्या कार्यालयात, फेसबुकवर तसेच संस्थेच्या www.dadarmatungaculturalcentre.org या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क ०२२-२४३०४१५०.
००००
