मुंबई : गोवा येथे नुकत्याच झालेल्या वाको इंडिया सीनियर नेशनल किकबॉक्सिंग चँपियनशिप २०२४ स्पर्धेत पनवेल शहर किकबॉक्सिंग असोसिएशनच्या सुयश पवारने ७४ किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावले. .त्यांच्याच चिराग शिवगणने रौप्य, अनुज भोसलेने १रौप्य,१कांस्य,फाल्गुनी दकोलियाने रौप्य आणि आर्यन शिवतरकरने कांस्यपदकाची कमाई केली. हर्षदा मोकलचे पदक मात्र थोडक्यात हुकले.पदक विजेत्या खेळाडूंना प्रशिक्षक निलेश भोसले यांचे मार्गदर्शन मिळाले.
या सर्व पदक विजेत्या खेळाडूंचे वाको इंडियाचे अध्यक्ष संतोष कुमार अग्रवाल सर , वाको महाराष्ट्रचे अध्यक्ष निलेश शेलास ,पनवेल शहर किकबॉक्सिंग असोसिएशनचे सचिव मंदार पनवेलकर यांनी खास अभिनंदन केले आहे.
