नांदेड :  मराठा समजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास आपला विरोध असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं होते, यावर नांदेडमध्ये एका पत्रकाराच्या प्रश्नावर प्रकाश आंबडेकर भडकले. तुझं जेवढं वय नाही, तेवढी माझी पत्रकारीतेत हयात गेलीय, असेही त्यांनी पत्रकाराला सुनावलं.

कुणबी मराठा डबल भूमिका घेत असेल, तर विधानसभा निवडणुकीत वंचित आघाडी एकही कुणबी मराठा उमेदवार देणार नाही आहे का? असा प्रश्न पत्रकाराने प्रकाश आंबेडकर यांना विचारला होता. त्यावरुन, आंबेडकर चिडले. तुझं जेवढं वय नाही ना, तेवढी तुझ्या ह्या पत्रकारितेत माझी गेलेली आहे. हे पेड विचारणारे प्रश्न आहेत, हे मला नका विचारु कारण मी राजकारणातला बाप आहे, असे म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकाराच्या प्रश्नावर संताप व्यक्त केला. या घटनेचा व्हिडिओही आता सोशल मीडियातून समोर आला आहे.

मराठा समाजाचा ओबीसी आरक्षणामध्ये कायदेशीररित्या समावेश होऊ शकत नाहीतसेच मनोज जरांगे पाटील यांच्या सगेसोयरे या मागणीला देखील आमचा विरोध आहेकुणबी हा ओबीसीत आहेत्यामुळे त्यांनी जर कागदपत्र दाखल केले तर त्यांना आरक्षण मिळू शकेलअसेही ते आंबेडकरानी म्हटले होतेतरआगामी विधानसभा निवडणुकीत कुणबी मराठा उमेदवार उभा राहिल्यास त्याला मतदान करु नकाअसे आवाहनही प्रकाश आंबेडकरांनी केलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *