शिवसेना मनसे आमने सामने

 

ठाणे : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने भगवा सप्ताह मोहीम राबविली जात आहे. या मोहीमेच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा शनिवारी सायंकाळी ठाण्यातील गडकरी रंगायतनात मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यासाठी मोठ्यासंख्येने पक्षाचे पदाधिकारी तसेच कार्येकर्त्यांनी गर्दी केली होती.
बीड मध्ये राज ठाकरे यांच्या ताफ्यावर उद्धव ठाकरे गटाच्या कार्यर्त्यांनी सुपाऱ्या फेकल्यामुळे आक्रमक झालेल्या ठाण्यातील मनसैनिकांनी गडकरी रंगायतन परिसरात गोंधळ घालण्यासाठी गर्दी केली होती. उद्धव ठाकरे यांचा ताफा ठाण्यात येताच, काही मनसैनिकांनी उद्धवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे ठाण्यातील सभेसाठी येत असताना मुलुंड चेक नाक्याजवळ ठाकरे यांच्या गाडीवर  शेण फेकले. तसेच पुढे त्यांचा ताफा आल्यानंतर ताफ्यावर नारळही फेकण्यात आले
पाच ते सहा जण मोठ्या पिशवीतून नारळ भरुन घेऊन आले होते. भर रस्त्यात उद्धव यांच्या ताफ्यावर हे नारळ फेकले जात होते. यावेळी सर्वसामान्य नागरिक देखील वाहनातून प्रवास करत होते. त्यामुळे नारळ नागरिकांना लागून दुर्घटना होण्याची शक्यता होती. त्यानंतर त्यांची गाडी गडकरी रंगायतन मध्ये पोहोचताच त्यांच्या गाडीच्या मागून मनसेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. तसेच त्यांच्या गाडीवर बांगड्या फेकण्यास सुरुवात केली. यावेळी मनसे आणि उद्धव सेनेचे कार्यकर्ते आमने सामने आले. यावेळी नौपाडा पोलीसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
यावेळी मनसे व शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी ‘उद्धव ठाकरे मुर्दाबाद’ अशाच्या घोषणा दिल्या. तसेच उद्धव ठाकरे यांना पुन्हा कधी ठाण्यात येऊ देणार नाही, असा इशारा देखील दिला.
आमचे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या मोटारीसमोर शुक्रवारी उद्धवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सुपाऱ्या फेकल्या. त्यामुळे मनसैनिकांमध्ये खदखद होती. आमच्या १५० ते २०० मनसैनिकांनी आंदोलन करून उद्धवसेनेला चोख प्रत्युत्तर दिले. मनसे जशास तसे उत्तर द्यायला मागेपुढे पाहणार नाही.- अविनाश जाधव, जिल्हाध्यक्ष, मनसे, ठाणे-पालघर
000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *