अशोक गायकवाड
कर्जत : कर्जत उपविभागीय अधिकारीपदी प्रकाश संकपाळ यांची प्रशासकीय बदलीने नियुक्ती झाली असून त्यांनी मंगळवार, ७ ऑगस्ट २०२४ रोजी उपविभागीय अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला. याप्रसंगी तहसीलदार डॉ.शीतल रसाळ यांनी पुष्पगुच्छ देवून त्यांचे स्वागत केले.
कर्जत पोलीस उपविभागीय अधिकारी डी.डी. टिळे, कर्जत उपविभागीय अधिकारी कार्यालय नायब तहसीलदार प्रसाद पाटील, कर्जत तहसील कार्यालय निवासी नायब तहसीलदार सचिन राऊत, खालापूर तहसील कार्यालय निवासी नायब तहसीलदार सुधाकर राठोड, कर्जत तहसील कार्यालय महसूल नायब तहसीलदार सोपान बाचकर, खालापूर तहसील कार्यालय नायब तहसीलदार मिलिंद तिऱ्हेकर, कर्जत पोलीस ठाणे, पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड, नेरळ पोलीस ठाणे, सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे, माथेरान पोलीस ठाणे, सहायक पोलीस निरीक्षक अनिल सोनोने, मंडळ अधिकारी माणिक सानप, संतोष जांभळे, वैशाली पाटील, बाबासो शेटे, तलाठी दत्ता ठोकळ, अभिजित हिवरकर, शिपाई बाळू आढाव, नथू गायकवाड, उघडा, मनोहर वाघ, राहुल गायकवाड यांनीही पुष्पगुच्छ देवून प्रशासकीय भवनामध्ये उपविभागीय अधिकारी कार्यालयात संकपाळ यांचे स्वागत केले.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *