नवी मुंबई : स्वातंत्र्यदिनाच्या वर्धापन दिनोत्सवानिमित्त कोकण विभागीय स्तरावरील ध्वजारोहण सीबीडी बेलापूर, नवीमुंबई येथील कोंकण भवन इमारतीच्या प्रांगणात गुरुवार दि. 15 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी ठीक 09.05 वाजता कोकण विभागीय महसूल आयुक्त पी.वेलरासू (भा.प्र.से) यांच्या हस्ते होणार आहे.
या राष्ट्रध्वज वंदन व संचलन समारंभास शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने राष्ट्रीय अथवा समारंभीय पोषाखात उपस्थित रहावे, समारंभ सुरु होण्याच्या 20 मिनिटे अगोदर कार्यक्रमस्थळी उपस्थित रहावे. तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने कृपया कोणतीही बॅग सोबत आणू नये, असे आवाहन कोकण विभागीय महसूल आयुक्त पी.वेलरासू यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *