पनवेल : भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीच्यावतीने रायगड जिल्ह्यातील खारघरमध्ये सर्वात मोठी ‘भव्य दिव्य ११११ फुट तिरंगा पदयात्रा’ होणार आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त १५ ऑगस्टला सकाळी १० वाजता खारघर मधील सेक्टर १९ येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल ते उत्सव चौक अशा मार्गाने या भव्य दिव्य तिरंगा यात्रेला प्रारंभ होणार आहे. या तिरंगा पदयात्रेत अनेक मान्यवर उपस्थित राहणार असून अविस्मरणीय अनुभव आणि देशभक्तीच्या या उत्सवात नागरिकांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी केले आहे.
