पंधरा ऑगस्ट रोजी सकाळी साडे सात वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून भारताचा तिरंगा फडकावतील तेव्हा तो एक ऐतिहासिक क्षण ठरेल. सलग अकराव्यांदा झेडा फडकावण्याचा मान मिळवणारे मोदी हे पं नेहरुंनंतरचे पहिलेच पंतप्रधान ठरतील हा तर एक भाग झालाच, पण स्वातंत्र्याच्या शंभरीकडे वाटचाल करण्याच्या एका महत्वाच्या टप्प्यावर भरात उभा असेल हाही एक ऐतिहासिक असा क्षण ठरणार आहे. आणखी 22 वर्षा नंतर देश स्वतंत्र्याचा शतक महोत्सव याच लाल किल्ल्या वरून सुरु करेल, तेंव्हा जगातील एक महत्वाचा विकसित देश भारत ठरावा ही महत्वाकांक्षा देशाने व्यक्त कऱण्याचा क्षणही या 15 ऑगस्ट रोजी येतो आहे, हेही ऐतिहासिक ठरावे असेच आहे. पंडित नेहरूंनी देशाचे पहिले पंतप्रधान म्हणून संसदेत 14 व 15 ऑगस्टच्या मध्यरात्री भाषण करून देशाला संदेश दिला होता की आपण नियतीशी जो करार केला होता त्याची पूर्ती स्वातंत्र्या निमित्ताने होते आहे. त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी देशवासियांना लाल किल्ल्या वरून संबोधित करताना पुन्हा देशा पुढील आव्हानांची आणि संधीची चर्चा केली होती. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपले अकरावे भाषण लाल किल्यावरून करताना देशापुढे विकसित भारताचे त्यांचे स्वप्न पुन्हा एकदा सविस्तरपणाने मांडतील अशी अपेक्षा आहे. यंदाच्या स्वतांत्र्यदिनासाठी विकसित भारत या संकल्पनेची निवड करण्यात आली असून विविध कार्यक्रम हे त्या अनुषंगाने गुंफण्यात आले आहेत. विकसित भराताची संकल्पना म्हणजे काय याचाही विचार या निमित्ताने व्हायला हवा. सर्वांना सुख लाभावे, सर्वांना उत्तम आरोग्य लाभावे, ही विकसाची कल्पना गृहित धरायची तर या उद्याच्या वाबीस तेवीस वर्षां नंतरच्या भरातात सर्व नागरिकांना राहण्यासाठी पक्के व सुरक्षित घर, त्यांच्या रोजीरोटीची नीट व्यवस्था, त्यांच्या सुरक्षेची घेतली गेलेली योग्य काळजी, नागरिकांना स्वच्छ पेय जन उपलब्ध असणे, त्यांच्या प्रवासाची साधने वेगवान आणि परवडणारी असतील याची घेतली गेलली काळजी, त्याच प्रमाणे सर्वांना योग्य व माफक किंमतीत आरोग्याची सुविधा, रुग्णालये, दवाखाने यांची पुरेसी व्यवस्था सज्ज ठेवणे अशा सर्व गोष्टी या विकसित भारत या संकल्पनेत अध्याहृत आहेत. आज विकसित देश म्हणून युरोपातील अनेक देश, रशिया, जपान, चीन आणि अमेरिका त्याच प्रमाणे ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड या देशांचा विचार आपण करतो. या सर्व देशात नागरिकांना आरोग्याची साधने अत्यंत माफक किंमतीती उपल्बध असतात. म्हणजेच सरकारी खर्चाने नागरिकांच्या उपचाराची व्यवस्था उपलब्ध असते. पण त्याच वेळी ज्यांना आवश्यकता वाटेल त्यांना रुग्णांलयात भरपूर पैसा देऊनही उपचार घेता येतात. त्या देशांचे दरडोई उत्पन्न हे आपल्या सध्याच्या उत्पन्नाच्या तुलनेत अनेक पटींनी अधिक आहे. उदाहरणार्थ अमेरिकेचे दरडोई उत्पन्न हे 85 हजार डॅालर्स पेक्षा अधिक आहे. जर्मनीत हाच आकडा 54 हजार डॅालर्सपेक्षा अधिक आहे तर भारताचे दरडोई उत्पन्न हे सध्या 2700 डॅालर्स इतके आहे. म्हणजे जेंव्हा अमेरिकेत प्रत्येक व्यक्तीमागे सकल राष्ट्रीय उत्पन्न हे 71 लाख 31 हजार सातशे रुपये आहे , तेंव्हा भारतात प्रत्येक व्यक्तीमागे सकल राष्ट्रीय उत्पन्न ( पर कॅपिटा जीडीपी ) हे दोन लाख 26 हजार पाचशे रुपये इतकेच आहे. आपल्या तीस पस्तीस पटीने अधिक अमेरिकेची श्रीमंती आहे हे उघडच आहे. त्याच वेळी युरोपातील प्रमुख देश जर्मनीचे दरडोई सकल राष्ट्रीय उत्पन्न हे 45 लक्ष 31 हजारा रुपये इतके भरते. या तीन्ही देशांतील सर्वसामान्य नागरिकांचे वार्षिक उत्पन्न म्हणजेच प्र्त्येक व्यक्तीची कमाई, सध्या किती आहे हे पाहिले तरीही हा फरक अधिक ठळक होतो. जेंव्हा अमेरिकेत नोकरदारांचा वार्षिक पगार हा सरासरीने सर्वसाधारणपणाने 45 लाख रुपयांच्या घरात असतो, तेंव्हा सर्वसाधारण भरातीय नोकरदारांना सरासरीने साडे नऊ लाखांच्या दरम्यान वार्षिक पगार मिळतो. आपल्याकडे उत्पन्नात मोठी तफावत आहे. म्हणजे किमान आठ हजार ते दीड लाख दरमहा अशा प्रकारचे पगार आपल्याकडे मिळत असतात. हे आकडे किमान व कमाल सरासरीने साधारणतः काढलेले आहेत.. हा फरक एव्हढ्याचसाठी अधोरेखित करावा लागेल की त्यामुळे आपल्याला खऱ्या अर्थाने विकसित व श्रीमंत राष्ट्र बनायचे असेल तर सकल राष्ट्रीय उत्पन्न त्याच बरोबर नागरिकांच्या सरासरी उत्पन्न किती मोठी भर पडावी लागेल याची कल्पना यावी. या दिशेने वाटचाल करताना विकसित भारत या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी फार मोठा टप्पा गाठायचा आहे. त्यासाठी तितकेच कठोर व सातत्यपूर्ण असे कष्ट देशातील नागरिकांना करावे लागणार आहेत. स्वातंत्र्याच्या 78 व्या वर्षात आपण आज प्रवेश करत असताना जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात जाणवणाऱ्या तृटींची संख्या मोठी आहे. एकतर देशतील नागरिकांचे विविध गटांतील उत्पन्नाच्या प्रमाणात फार मोठी दरी आहे. शिक्षणाचा स्मतर व दर्द्येजाही उंचावणे आवश्यक आहे. राज्य व केंद्र सरकारांच्या योजनांचे लाभ जनतेपर्यंत पोचत असताना मोठे अडथळे येतात ते दूर करून सर्व व्यवस्था सुधारण्याचा मोठी गरज आहे. नव्या प्रकारच्या जातीपातींच्य भिंती तयार होत असताना जुना चातुरव्रारणीय जातावादही फोफावतो आहे. या सर्व अडथळ्यांवर मात करून सुजलाम सुफलाम असा भारत देश पुढछ्या पाव शतकात साकार होवो अशा शुभेच्छा आपण सर्व एकमेकांना देऊया. त्याच बरोबर स्वप्न पूर्तीचा उत्तुंग हिालय सर करण्यासाठी आलश्यक कष्टांसाठी कंबरही कसूया !!
