राजीव चंदने
मुरबाड : भारतिय स्वातंत्र्याचा 78 वा स्वातंत्र्य दिन देशभर जल्लोषात साजरा होत असताना, मुरबाड शहरासह तालुक्यातही धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. तालुक्यातील अनेक शाळांमध्ये इयत्ता 10 वी , आणि 12 वीच्या परिक्षेत प्रथम आलेल्या विद्यार्थाच्या हस्ते ध्वजारोहणाचा स्तुत्य उपक्रम सुरु केला असून त्या अनुषंगाने भुवन ग्रामपंचायत ने मागिल दोन वर्षापासून ग्रामसभेत ठराव घेऊन व शाळा व्यवस्थापन समितीच्या शिफारसीनुसार ध्वज फडकविण्याचा मान माध्यमिक शाळांत परिक्षेत सन 2023-24 च्या शैक्षणिक वर्षात भुवन गावचे अभ्यासू पत्रकार दिलीप पवार यांची मुलगी कु. समिक्षा दिलीप पवार हिच्या हस्ते फडकविण्याचा मान मिळाला आहे. समिक्षाला इयत्ता 10 वी सेमी इंग्रजी मध्ये 85.60 % गुण मिळाले आहेत . भुवन ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन समितीने घेतलेल्या या ऐतिहासिक निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. अशा निर्णयामुळे गावातील इतर विद्यार्थ्यांना त्याची प्रेरणा मिळते व देशाचा राष्ट्रध्वज फडकविण्याचा भाग्य मिळणार असल्याने निश्चितच हे भुषणावह आहे. 78 व्या ध्वजारोहणासाठी भुवन ग्रामपंचायतच्या सरपंच भुमिका भरत बांगर , उपसरपंच सुनिल गौतम बांगर , सरपंच रघुनाथ बांगर, ग्रा. सदस्य भावेश भोईर , माया लक्ष्मण भोईर, पुनम खरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिलीप दामोदर बांगर , दाजी बांगर, भुवन जि.प. शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वृंद यांच्यासह शाळेचे विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
