माथेरान : लक्ष शूटिंग क्लब पनवेल या संस्थेमार्फत १५ ऑगस्टला माथेरानमध्ये स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून येथील सनसेट पॉईंट या ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात आले माथेरानमध्ये दरवर्षी अशा प्रकारच्या अभियान ही संस्था राबवत असते.
माथेरानमध्ये सलग लागून आलेल्या सुट्टीच्या पार्श्वभूमीवर अनेक पर्यटक दाखल झाले आहे व हे पर्यटक येथील विविध प्रेक्षणीय स्थळांवरती फिरण्यास जात असतात व अशा ठिकाणी आपल्या जवळील पाण्याचा रिकाम्या बॉटल त्याचप्रमाणे खाद्यपदार्थांचे रिकामे पाऊच हे उघड्या जागेवर किंवा जंगलामध्ये फेकून देत असतात. ज्यामुळे येथील जंगल हे विद्रूप होत आहे.माथेरान मधील निसर्ग अबाधित ठेवायचा असेल तर जंगल स्वच्छ राहणे ही काळाची गरज आहे.या खेरीज माथेरान मधील काही मोजकेच तरुण स्वतःहून येथील विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवत असतात.दि.१५ रोजी येथे पनवेलहून लक्ष शूटिंग क्लब या संस्थेचे देश पातळीवर सहभागी होणारे स्पर्धक व प्रशिक्षणार्थी यांनी स्वच्छता मोहीम राबवून येथील सनसेट पॉईंट परिसरामध्ये स्वच्छता केली, ही संस्था दरवर्षी माथेरान मधील विविध ठिकाणी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने येऊन स्वच्छता अभियान राबवत असते व या निमित्ताने स्वच्छतेचे धडे पर्यटकांना देत असते.
——————————————————-
माथेरान हे जागतिक जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ आहे त्यामुळे स्वच्छ भारत अभियानास   आपल्या मार्फत ही हातभार लागावा या संकल्पनेतून आम्ही दरवर्षी माथेरान मधील विविध भागांमध्ये स्वच्छता अभियान राबवत असतो व येथून जमा केलेला कचरा खाली घेऊन जाऊन रिसायकल करून इतरत्र वापरत असतो.
सिद्धार्थ शिरूर— शिक्षक,लक्ष शूटिंग क्लब पनवेल
———————–;————;;——;;;——–
या पर्यावरणाच्या आधारे समस्त माथेरानकर आपली उपजीविका भागवतात.
पण या पर्यावरणाची काळजी नाही इथला स्टॉल धारक घेत, ना दुकानदार, ना गावकरी.
सर्वांना माथेरानची ओळख म्हणजे फक्त पैसाच वाटत आहे.
पर्यावरणाची आवड इथल्या लोकांमध्ये केव्हा निर्माण होईल माहित नाही परंतु लक्ष शूटिंग क्लब या शाळेच्या विद्यार्थ्यांनी दाखवून दिलं माथेरान किती महत्त्वपूर्ण पर्यटनस्थळ आहे. त्यांनी सनसेट पॉईंटला ज्याप्रकारे स्वच्छता अभियान केलं ते कौतुकास्पद आहे.
राकेश कोकळे —स्वच्छतादूत माथेरान
००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *