अशोक गायकवाड

अलिबाग :१८ ऑगस्टला सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या जयंती उत्सवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी आरसीएफच्या कुरुळ वसाहतीच्या प्रवेशद्वारा जवळ असलेल्या सरखेलांच्या पुतळ्यास आरसीएफचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्रीनिवास मुडगेरिकर यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
तसेच आरसीएफच्या वित्त संचालक श्रीमती नझहत शेख, कार्यकारी संचालक अनिरुद्ध खाडिलकर, मुख्य महा व्यवस्थापक नितीन हिरडे, महा व्यवस्थापक सर्वश्री संजीव हरळीकर, सुधीर कोळी, अभय काळबांडे, व्ही. मगेश, सिआयएसएफचे डेप्युटी कमांडंट संदीप चक्रवर्ती, उप महा व्यवस्थापक विनायक पाटील, अधिकारी- कर्मचारी संघटना प्रतिनिधींनी सरखेलांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण केली. यावेळी शिवप्रेमी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *