शिवाजीराव जोंधळे हत्येप्रकरणी समर्थ समाज ट्रस्टचे अध्यक्ष सागर शिवाजीराव जोंधळे यांची मागणी
अनिल ठाणेकर

 

 

ठाणे : शिक्षणसम्राट शिवाजीराव जोंधळे यांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, नामचीन गुंड प्रशांत देशमुख, तसेच गीता खरे, वर्षा देशमुख, प्रीतम देशमुख, हर्षकुमार खरे, स्नेहा खरे यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी अशी जाहीर मागणी शिवाजीराव जोंधळे यांचे ज्येष्ठ सुपुत्र व समर्थ समाज ट्रस्टचे अध्यक्ष सागर जोंधळे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केली. यावेळी त्यांच्या आई व ट्रस्टच्या उपाध्यक्षा वैशालीताई शिवाजीराव जोंधळे, भाऊ व ट्रस्टचे सेक्रेटरी देवेंद्र शिवाजीराव जोंधळे, बहिणी श्वेतांबरी शिवाजीराव जोंधळे, वैष्णवी गायकवाड, भाऊ किशोर जोंधळे आदी परिवारातील सदस्य उपस्थित होते.
शिक्षणसम्राट शिवाजीराव जोंधळे यांना यकृताचा कर्करोग झाला होता. या आजारपणचा गैरफायदा घेऊन त्यांची संपत्ती, मिळकत, जमीन,  व्यापारी गाळे, सोने, रोकड अशी कोट्यावधीची प्राॅपर्टी शिवाजीराव यांच्याशी विवाहबाह्य संबंध असलेल्या गीता खरे व त्यांच्या परिवाराने  हडप केली तसेच शिवाजीरावांवर उपचारात अक्षम्य हलगर्जीपणा करुन त्यांची नियोजनबद्ध हत्या घडवून आणली. याबाबत विष्णुनगर पोलीसांत तक्रार करुनही त्यांनी गीता खरे व त्यांच्या परिवारावर कोणतीही कारवाई न केल्याने अखेर कल्याण प्रथम वर्ग न्यांयालयाने याचिका दाखल केल्यावर न्यायालयाने, याप्रकणी गीता खरे,वर्षा देशमुख, प्रीतम देशमुख, हर्षकुमार खरे, स्नेहा खरे यांच्याविरोधात गुन्हा नोंदवून त्यांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. गीता खरे व त्यांच्या कुटुंबियांना शिवाजीराव जोंधळे यांच्या हत्येप्रकरणी सक्रिय सहकार्य करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव व नामचीन गुंड प्रशांत देशमुख यांच्यावरही शिवाजीराव जोंधळे हत्याप्रकरणात गुन्याची नोंद करुन त्यांनाही अटक करावी अशी जाहीर मागणी समर्थ समाज ट्रस्टचे अध्यक्ष सागर जोंधळे यांनी केली आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, ‘शिवाजीराव जोंधळे यांचे गेले ३० वर्षाचे आमचे मैत्रीपूर्ण संबंध होते. प्रीतम देशमुख हा माझा नातेवाईक असल्याने तेवढाच माझा संबंध आहे.पण सागर जोंधळे यांना मी ओळखत नाही, ते काळा की गोरा मला माहित नाही. त्यामुळे सागर जोंधळे यांनी दावा केलेल्या प्रकरणाशी माझा काहीही  आणि कोणताही संबंध नाही.याबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरु असल्याने पोलीस योग्य तो तपास करतीलच.’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *