ठाणे : शारदा एज्युकेशन सोसायटी आणि आनंद विश्व गुरुकुल आणि कनिष्ठ महाविद्यालय यांच्या रॉट्रॅक्ट क्लब व एनसीसी कॅडेट्स यांच्या सौजन्याने विद्यार्थ्यांनी ठाण्यातील आनंद दिघे जिद्द स्कूल मधील विद्यार्थ्यां सोबत रक्षाबंधन साजरा केला.
सामाजिक बांधिलकीच्या नात्याने आनंद विश्व गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी मार्गदर्शिका प्राध्यापिका लीना रासकर आणि धनश्री मॅडम यांच्या समवेत हा रक्षाबंधनाचा सण साजरा केला. यावेळी रोट्रॅक्ट क्लबचे विद्यार्थी आणि एनसीसीच्या मुली यांनी या रुग्णांच्या हातावर राखी बांधून व औक्षण करून समाजातील बांधिलकी व्यक्त केली. या प्रसंगी आनंद विश्व गुरुकुलच्या उप प्राचार्या दिपीका तलाठी मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या प्रसंगी रोटरी ग्रीन सिटीचे अध्यक्ष प्रशांत सर उपस्थित होते.
शारदा एज्युकेशन सोसायटीचे व्यवस्थापन, आनंद विश्व गुरुकुल च्या प्राचार्या डॉक्टर सीमा हर्डीकर मॅडम, उपप्राचार्या  सौ दीपिका तलाठी मॅडम या साऱ्यांनी वेळोवेळी  केलेल्या प्रोत्साहनामुळे रक्षाबंधनाचा हा कार्यक्रम सर्वांग परि साजरा करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *