ठाणे :आनंदपार्क येथील देवी मंडपात ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून शिवसेना उपनेते स्व. अनंत तरे व महाराष्ट्र कोळी समाज संघाचे अध्यक्ष स्व. जयेश अनंत तरे यांच्या स्मरणार्थ शिवसेना उध्दव बाळासाहेव ठाकरे गटाचे ठाणे शहर समन्वयक माजी नगरसेवक संजय तरे व ठाणे जिल्हा महिला उप संघटक माजी नगरसेविका महेश्वरी संजय तरे यांच्या वतीने आनंदपार्क आणि परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना शिवसेनेच्या माजी नगरसेविका नंदिनी राजन विचारे ह्यांच्या हस्ते मोफत छत्री वाटप करण्यात आले.
मोफत छञी वाटप कार्यक्रमाच्या सुरवातीला शिवसेना उपनेते स्व. अनंत तरे यांचे चिरंजीव आणि महाराष्ट्र कोळी समाज संघाचे अध्यक्ष जयेश अनंत तरे यांना नुकतीच ३ महिन्यापुर्वी देवाज्ञा झाली. त्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी नगरसेविका व कार्यक्रमाच्या आयोजिका महेश्वरी संजय तरे यांनी व्यक्त केले. महेश्वरी तरे म्हणाल्या की, आमचे दादा स्व. अनंत तरे यांचे समाज सेवेचे कार्य आम्ही तरे कुटुंबीय असेच पुढे नेत राहू आज ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ज्येष्ठांचा आम्ही सन्मान करुन ज्येष्ठांनी आम्हा तरे कुटुंबीयांना जो आशिर्वाद दिला. त्यामुळे आमचे बळ आणखीनच वाढले आहे. आणि आम्ही ज्येष्ठांचे खुप कृतज्ञ आहोत.
सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे माजी नगरसेविका नंदिनी राजन विचारे यांच्या हस्ते शेकडो ज्येष्ठ महिला व पुरुष नागरिकांना मोफत छञी वाटप केले. या प्रसंगी सर्व ज्येष्ठ नागरिकांनी महेश्वरी तरे व संजय तरे यांनी केलेल्या उपक्रमाचे स्वागत करुन कौतुक केले.
सदर मोफत छञी वाटप कार्यक्रमाला शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महिला विभाग संघटक वैशाली मोरे, विभागप्रमुख मयुर पैलकर, विभाग समन्वयक योगेश भोईर, उप विभागप्रमुख दादु शिंदे, महिला उप विभागप्रमुख अनुराधा चव्हाण, उप विभागप्रमुख मनोज पाटील, सत्यवान कदम, आझादनगर शाखेचे शाखाप्रमुख संतोष दंत, महिला शाखा संघटक जया बामगुडे, उप शाखा संघटक सुनीता सपकाळ, सागर माने, ज्येष्ठ शिवसैनिक शंकर माने, ज्येष्ठ नागरिक ह.भ.प. नंदकुमार चाचे, आंधळे गुरुजी, भक्ती योगेश भोईर, सावली ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या अध्यक्षा चव्हाण, महिला शिवसैनिक कल्पना मोरे, कल्पना कदम, मयुरी कदम, सुनिता उतेकर, अरुणा आर्डे, शिवसैनिक बाबु देशमुख, संतोष गवई, सुनिल भोईर, जितेंद्र राणे, मिनल लाड आदी संह मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्र संचालन शाखाप्रमुख संतोष दंत यांनी केले.
तसेच आनंदपार्क, आझादनगर, ऋतुपार्क, वृंदावन, श्रीरंग परिसरातील गोर गरीब गरजू विद्यार्थ्यांना स्व. अनंत तरे साहेबांनी सुरु केलेल्या प्रथा परंपरे नुसार सालाबाद प्रमाणे मोफत वह्या वाटप रविवार, २५ ऑगस्टला संध्याकाळी ७ वाजता आनंदपार्क येथील देवी मंडपात होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *