मुंबई: प्रभादेवीतील परळ एस.टी. डेपो जवळील सत्यम रघुवंशी या कपड्याच्या दुकानाचे मालक नगराजजी शेषमलजी श्रीश्रीमालजी (जैन) वय-64 यांचे काल शनिवारी आकस्मिक निधन झाले.त्यांच्या निधनाबद्दल एल्फिन्स्टन रोड व्यापारी असोसिएशनने तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.त्यांच्या पश्चात पत्नी रेखा, विवाहित कन्या प्रीती,स्नुषा केजल आणि पुत्र चार्टंड अकौटंट केतन जैन व नातवंडे आहेत. नागराजशेठ या नावाने ते मराठी ग्राहकांमध्ये लोकप्रिय होते.ते मुळचे राजस्थानमधील रानीगांवचे रहिवाशी होते.पण गेल्या ५० वर्षांपासून ते मुंबईत वास्तव्यास असल्यामुळे मराठी संस्कृती, सण याविषयी त्यांना विशेष आस्था होती.अस्खलित मराठीत बोलणे ही त्यांची खासियत होती. त्यांच्या अकस्मात निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यात येत आहे. त्यांचा श्री शत्रुंजय भावयात्रा व शोकसभेचा कार्यक्रम हा सोमवारी २ सप्टेंबर रोजी दु.१२ ते १:३० पर्यत महाजनवाडी,वोल्टास कपौडच्या समोर चिंचपोकळी येथे होणार आहे.
00000
