शालेय विद्यार्थ्यांच्या गणेश मूर्ती वर्कशॉपने  श्री गणेशा…

मुंबई : ४ सप्टेंबरला डॉ. राजेश मढवी फाऊंडेशन व दै.लोकमत संचलित गणेश दर्शन स्पर्धेचा श्री गणेशा संपन्न झाला. ठाण्याच्या कोरम मॉल येथे शालेय विद्यार्थ्यांचे गणेश मूर्ती बनवण्याचे वर्कशॉप आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये ठाण्यातील संकल्प विद्यालय, ब्राह्मण विद्यालय,संकेत विद्यालय, शारदा विद्यालय व न्यू इंग्लिश स्कूल अशा विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी उस्फूर्त भाग घेतला. गणेशाची सुबक मूर्ती बनविण्याचे प्रात्यक्षिक
प्रशिक्षीत शिक्षकाने दिले. या छान उपक्रमात संस्थे तर्फे मा. नगरसेविका प्रतिभा राजेश  मढवी तसेच दै. लोकमत तर्फे सांस्कृतिक विभाग प्रमुख नितीन खरे तसेच विविध शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते. तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण  बोर्डाच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांकडून प्रदुषणमुक्त ,पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करू अशी प्रतिज्ञा घेण्यात आली. गणेशोत्सवाचे औचित्य साधून शालेय मुलांच्या कलागुणांना वाव देण्याचा हा एक छोटासा प्रयास आहे असे प्रतिपादन संस्थेच्या वतीने मा.नगरसेविका प्रतिभा राजेश मढवी यांनी केले.
००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *