मुरबाड प्रतिनिधी (राजीव चंदने )
मुरबाड विधानसभेचे बिगूल वाजताच काही दिवस शिल्लक असल्याने राजकीय पक्षात कार्यकर्त्यांची इनकमिंग, आणि आऊट गोईंग सुरु झाली असून . मुरबाड विधानसभा क्षेत्राचे कार्यसम्राट आमदार किसन कथोरे यांच्या विकास कामांवर प्रभावित होऊन मागच्या आठवड्यातच टोकावडे व परिसरातील एक मोठा गट कथोरेंच्या उपस्थितीत भाजपात दाखल झाला आहे. त्यानंतर आज कथोरे यांच्या मुरबाड येथील निवास स्थानी तालुक्यातील मौजै मानिवली (गों) व मुरबाड शेजारील देवलार वाडी येथिल ग्रामस्थांनी आमदार किसन कथोरेंच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे. यावेळी प्रवेश घेतलेल्या कार्यकर्तांचे आमदार कथोरे यांनी स्वागत करुन त्यांना शुभेच्छा दिल्या. देवलार वाडीच्या कार्यकर्ताना आणण्यासाठी सुरज कोळेकर , मनोज कोळेकर यांनी मेहनत घेतली तर मानिवली येथिल संतोष पवार यांचे याकामी योगदान लाभले.
