कर्जतः कर्जत उपविभागीय (प्रांत) अधिकारी प्रकाश संकपाळ यांच्या अध्यक्षतेखाली कर्जतमध्ये शांतता कमिटी सदस्य व मोहल्ला कमिटीची सभा संपन्न झाली.
कर्जत पोलीस ठाणे हद्दीत मंगळवारी सकाळी अकरा वाजता कर्जत उपविभागीय (प्रांत) अधिकारी प्रकाश संकपाळ यांच्या अध्यक्षतेखाली कर्जतचे तहसीलदार धनंजय जाधव, कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी डी.डी. टेळे , कर्जत अपर तहसीलदार दुर्गा देवरे, कर्जत नगर परिषद मुख्याधिकारी वैभव गारवे, कर्जत पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांच्या उपस्थितीत कर्जत येथील प्रशासकीय भवनात कर्जत पोलीस ठाणे यांच्या वतीने पोलीस हद्दतील शांतता कमिटी सदस्य व मोहल्ला कमिटी सदस्य यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीमध्ये गणेशोत्सव व ईद ए मिलाद सण शांततेत पार पडण्याच्या अनुषंगाने योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले. तसेच गणेशोत्सव सणाच्या अनुषंगाने नागरिकांच्या रस्ते, वीज, वाहतुकीची समस्या याबाबत असणाऱ्या समस्या जाणून घेऊन त्यावर सकारात्मक चर्चा करण्यात आली आहे. सदर बैठकीत करिता उपविभागीय पोलीस अधिकारी डी डी टेळे, तहसीलदार कर्जत धनंजय जाधव, अपर तहसीलदार दुर्गा देवरे, कर्जत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी वैभव गारवे, पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड, कर्जत पोलीस ठाणे, गोपनीय विभागाचे पोलीस नाईक संतोष साळुंखे व सर्व प्रशासकीय विभागाचे प्रमुख अधिकारी यांच्या सह ४५ ते ५० शांतता व मोहल्ला कमिटी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *