सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून अनिल पाटील यांनी पदभार स्वीकारला. मावळते जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांनीही नव्या जिल्हाधिकाऱ्यांचे स्वागत केले.
