मुंबई: गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाचा सण आहे, ज्यात भक्त मोठ्या उत्साहाने बाप्पाची स्थापना आणि विसर्जन करतात. ढोल-ताशांच्या गजरात आणि उत्सवाच्या जल्लोषात नागरिक सहभागी होतात. मात्र, याच पार्श्वभूमीवर पोलिसांना देखील उत्सवाच्या गजरात नाचताना पाहणे आता इतिहासात जमा होणार आहे. मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी कडक आदेश काढले आहेत, ज्यात गणेशोत्सवादरम्यान पोलिसांना नाचण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी गणेशोत्सवाच्या निमित्ताने सर्व पोलिसांना निर्देश दिले आहेत की, गणेशोत्सवादरम्यान कोणताही पोलीस कर्मचारी ढोल-ताशांच्या तालावर नाचताना आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा आणि बंदोबस्ताच्या आढावा बैठकीत आयुक्तांनी हे आदेश दिले आहेत.
आयुक्तांनी सांगितले की, “गणेशोत्सव हा सार्वजनिक उत्सव आहे आणि पोलिसांचा मुख्य उद्देश नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करणे हा आहे. या काळात पोलीस कर्मचारी सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या कर्तव्यात व्यस्त असले पाहिजेत, नाचणे हे त्यांच्यासाठी योग्य नाही. त्यांनी अधिकाऱ्यांना ताकीद देत सांगितले की, “जर कोणताही कर्मचारी नियमांचे उल्लंघन करत नाचताना आढळला तर त्याच्यावर तात्काळ कारवाई करण्यात येईल.
सुरक्षा व्यवस्थेवर भर
गणेशोत्सवाच्या काळात मुंबईसारख्या मोठ्या शहरात सुरक्षा व्यवस्थेला अत्यंत महत्त्व दिले जाते. लाखो भाविक बाप्पाच्या दर्शनासाठी गणपती मंडळांमध्ये गर्दी करतात, आणि त्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावला जातो. यावर्षीही गणेशोत्सवाच्या काळात विशेष सुरक्षा योजना आखण्यात आली आहे. पोलीस आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार, प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याने त्यांच्या कामात प्रामाणिकपणे लक्ष दिले पाहिजे आणि कुठलाही गैरप्रकार घडणार नाही याची काळजी घ्यावी.
मुंबईतील गणेशोत्सवाच्या काळात विशेषत: सार्वजनिक ठिकाणी जसे कि चौक, रस्ते, गणपती मंडळे, विसर्जन स्थळे या ठिकाणी पोलिसांचा मोठा ताफा तैनात असेल. गणेशोत्सवात होणाऱ्या गर्दीमुळे अनुशासन राखणे आणि कोणताही अनुचित प्रकार टाळणे हे पोलिसांचे प्रमुख कर्तव्य असेल.
मुंबईतील गणेशोत्सवाच्या काळात विशेषत: सार्वजनिक ठिकाणी जसे कि चौक, रस्ते, गणपती मंडळे, विसर्जन स्थळे या ठिकाणी पोलिसांचा मोठा ताफा तैनात असेल. गणेशोत्सवात होणाऱ्या गर्दीमुळे अनुशासन राखणे आणि कोणताही अनुचित प्रकार टाळणे हे पोलिसांचे प्रमुख कर्तव्य असेल.
0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *